शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नितीश यांना सीएमपदावरून हटवण्यासंदर्भातल्या याचिकेवर न्यायालयानं निवडणूक आयोगाकडे मागितलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 16:21 IST

नितीश कुमार हे बिहारच्या मुख्यमंत्रिपदी राहण्यास अयोग्य असल्याच्या दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला नोटीस बजावत उत्तर मागितलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांत उत्तर देण्याची मुदत दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील एम. एल. शर्मा यांनी नितीश कुमारांविरोधात याचिका दाखल केली असून, नितीश कुमार यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखल असलेले गुन्हे सादर केले नसल्याचा आरोप याचिककर्त्यानं केला आहे.

नवी दिल्ली, दि. 11 - नितीश कुमार हे बिहारच्या मुख्यमंत्रिपदी राहण्यास अयोग्य असल्याच्या दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला नोटीस बजावत उत्तर मागितलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांत उत्तर देण्याची मुदत दिली आहे.सर्वोच्च न्यायालयाचे वकील एम. एल. शर्मा यांनी नितीश कुमारांविरोधात याचिका दाखल केली असून, नितीश कुमार यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखल असलेले गुन्हे सादर केले नसल्याचा आरोप याचिककर्त्यानं केला आहे. नितीश कुमार यांनी 2004 आणि 2012च्या निवडणुकीतील दाखल प्रतिज्ञापत्रात 1991मध्ये झालेल्या हत्येच्या प्रकरण त्यांच्या विरोधात दाखल असलेल्या एफआयआरचा उल्लेख केलेला नाही. नितीश यांनी प्रतिज्ञापत्रात ही माहिती लपवल्यामुळे त्यांना संवैधानिक पदावर राहण्याच्या अधिकार नसल्याचं या याचिकाकर्त्यानं म्हटलं आहे. तसेच त्यांची विधान परिषद सदस्यताही अयोग्य असल्याचं वकील एम. एल. शर्मा म्हणाले आहेत. काय हे प्रकरण ?बिहारमध्ये जेडीयूनं लालूप्रसाद यादवांच्या पक्षाशी महागठबंधन तोडल्यानंतर लालूंनी नितीश कुमार यांच्याविरोधात गंभीर आरोप केले होते. नितीश कुमार यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा असल्याचा आरोपही लालूंनी केला होता. 26 वर्षांपूर्वी पंडारखा क्षेत्रातील ढीबर गावात राहणा-या अशोक सिंह यांनी नितीश कुमारांसह अन्य लोकांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.अशोक सिंह यांनी याबाबत दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आरोप केले आहेत की, बाढ जागेवरील मध्यावधी निवडणुकांच्या वेळी सीताराम सिंह यांच्यासोबत मतदान देण्यासाठी मतदान केंद्रावर गेले होते. त्याच वेळी जनता दलाचे उमेदवार नितीश कुमार तेथे आले. त्यांच्यासोबत आमदार दिलीप कुमार सिंह, दुलारचंद यादव, योगेंद्र प्रसाद आणि बौधू यादव उपस्थित होते. सर्व लोकांजवळ बंदूक, रायफल्स आणि पिस्तूल होतं. त्यानंतर नितीश कुमार यांनी माझ्या भावाला जिवानिशी मारण्यासाठी गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. एफआयआरमध्ये गोळीबारात इतर लोकही जखमी झाल्याचं म्हटलं आहे. मात्र या प्रकरणात नितीश कुमारांविरोधात अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.