शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्रज्ञासिंहच्या सत्कारास कोर्टाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 08:11 IST

Mumbai News: सन २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर हिचा गुढीपाडव्यानिमित्त ‘हिंदू वीर’ पुरस्काराने सन्मान करण्यास सकल हिंदू समाज या संघटनेला उच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. हा कार्यक्रम आज, रविवारी होणार आहे.

 मुंबई - सन २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर हिचा गुढीपाडव्यानिमित्त ‘हिंदू वीर’ पुरस्काराने सन्मान करण्यास सकल हिंदू समाज या संघटनेला उच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. हा कार्यक्रम आज, रविवारी होणार आहे.   

न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या सत्कार कार्यक्रमास परवानगी देताना काही कठोर अटी घातल्या आहेत. सकाळी ७ ते संध्याकाळी ५ या वेळेतच हा कार्यक्रम आयोजित करावा लागणार आहे. हा कार्यक्रम रमजानच्या एक दिवस आधी होणार आहे.

‘’स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर, या देशातील नागरिक साक्षर आणि शहाणे होत आहेत, असे मानण्याची कारणे आपल्याकडे आहेत. या कार्यक्रमात वक्ते लोकांपुढे विचार मांडताना अन्य धर्मीयांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची खबरदारी घेतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. आम्ही अशा बाबींमध्ये अतिसंवेदनशील असू शकत नाही. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करण्यावर आणि ‘जगा आणि जगू द्या’ या ब्रीदवाक्यावर विश्वास ठेवतो, असे न्यायालयाने नमूद केले. 

अनुचित प्रकार घडणार नाही, याची हमी द्या कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची हमी देणारे प्रतिज्ञापत्र आयोजकांनी  नाशिकच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकांना सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. याव्यतिरिक्त पोलिसांनी मिरवणुकीसाठी एक विशिष्ट मार्ग निश्चित करावा, जेणेकरून ती गर्दीच्या ठिकाणांवरून जाणार नाही. पोलिसांनी कार्यक्रमासाठी पुरेसे संरक्षण द्यावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले.

टॅग्स :Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरMadhya Pradeshमध्य प्रदेश