जयपूर : बदलत्या काळात सोशल मीडिया हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला असला तरी आता अनेक विवाहित जोडपी आपले वैवाहिक आयुष्य या आभासी दुनियेतून दूर ठेवू लागली आहेत. “जे पती-पत्नी आपले वैयक्तिक क्षण सोशल मीडियावर मांडत नाहीत, ते तुलनेत जास्त आनंदी व समाधानी असतात”, असे शहरातील मॅरेज काउन्सिलर्स सांगतात.
जीवनातील प्रत्येक क्षण फेसबुक-इन्स्टाग्रामवर दाखविण्याच्या प्रयत्न करतात. सतत सोशल मीडियावर आपले खासगी जीवन जगासमोर मांडणारे सरासरी १० ते १५ जोडपी दररोज समस्या घेऊन समुपदेशकांकडे येतात.
नाते टिकवण्यासाठी...
- आठवणी मनात साठवा, सोशल मीडियावर नाही. छोट्या गोष्टींमध्येही आनंद शोधा.
- एकत्र वेळ घालवा, एकमेकांच्या
- भावना ऐका. अडचणी आल्या तर संवाद साधा, जगासमोर उघड करू नका.
खरी मजा ऑफलाइनच
रिलेशनशिप काउन्सिलर दीपशिखा गोखले यांनी सांगितले, “आमच्याकडे येणाऱ्या दररोजच्या जोडप्यांपैकी ४-५ जोडपी अशी असतात, जी सोशल मीडियावर ‘परफेक्ट कपल’चे चित्र उभे करतात.
‘लाइक-रिॲक्शन’वर मोजतात नात्यांचा आनंद
रिलेशनशिप काउन्सिलर म्हणाल्या, “जोडपी जितकी जास्त आपली वैयक्तिक जीवनशैली सोशल मीडियावर शेअर करतात, तितकी त्यांच्यात असुरक्षितता व तुलना करण्याची भावना वाढते. एखाद्या फोटोवरील लाईक वा कमेंट नात्यातील आनंदाचे मोजमाप ठरते. ५० जोडप्यांपैकी ३० टक्क्यांवर सोशल मीडिया प्रतिक्रियांचा थेट परिणाम दिसतो.”