शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

हनिमूनसाठी शिलाँगला गेलेलं जोडपं बेपत्ता, बेवारस स्थितीत सापडली दुचाकी, त्यांच्यासोबत नेमकं घडलं काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 17:24 IST

Crime News: लग्नानंतर ईशान्य भारतातील शिलाँग येथे गेलेलं इंदूर येथील नवविवाहित जोडपं  अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लग्नानंतर ईशान्य भारतातील शिलाँग येथे गेलेलं इंदूर येथील नवविवाहित जोडपं  अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ११ मे रोजी विवाहबद्ध झालेले राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी २० मे रोजी हे शिलाँग येथे हनिमून साजरा करण्यासाठी गेले होते. त्यांचं शेवटचं लोकेशन शिलाँगमधील संवेदनशील भाग असलेल्या ओसरा हिल येथे दिसले. तिथे त्यांनी भाड्याने घेतलेली दुचाकी बेवारस स्थिती सापडली आहे. आता स्थानिक पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

इंदूरमध्ये वाहतुकीचा व्यवसास करणारे राजा रघुवंशी यांचं ११  मे रोजी धुमधडाक्यात लग्न झालं होतं. त्यानंतर नवदाम्पत्य २० मे रोजी हनिमूनसाठी इंदूरहून बंगळुरू आणि तिथून पुढे गुवाहाटीला गेलं होतं. गुवाटाटीमध्ये कामाख्या मातेचं दर्शन घेतल्यावर ते २३ मे रोजी शिलाँगला पोहोचले होते. शिलाँगला गेल्यावरही ते कुटुंबीयांच्या संपर्कात होते. मात्र २३ मे नंतर त्यांच्याशी असलेला कुटुंबीयांचा संपर्क तुटला होता.

राजा यांचा थोरला भाऊ सचिन रघुवंशी याला वाटलं की, कदाचित नेटवर्कची समस्या असल्याने फोन लागत नसेल. मात्र २४ मे रोजी दोघांचेही फोन बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत पडले. कुठलाच संपर्क होत नसल्याने सोनमचा भाऊ गोविंद आणि राजाचा भाऊ बिपिन विमानाने तातडीने शिलाँगला पोहोचले. गोविंद याने गुगल मॅप आणि त्यांच्या फोटोंच्या माध्यमातून लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना भाड्याने दुचाकी देणाऱ्या एजन्सीचा पत्ता सापडला. या जोडप्याने आपल्याकडून दुचाकी भाड्याने घेतल्याची आणि तिथून ओसरा हिलच्या दिशेने गेल्याची  माहिती दिली.

त्यानंतर या जोडप्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा या जोडप्याने भाड्याने नेलेली दुचाकी तिथे बेवारस स्थिती दिसून आली. या भागाग ओरसा नावाचा एक रिसॉर्टही आहे. हा रिसॉर्ट गुन्हेगारांचा अड्डा मानला जातो. राजा रघुवंशी यांचा भाऊ सचिन रघुवंशी याने सांगितले की, भाषेच्या समस्येमुळे स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात अडचणी येत आहेत. त्यानंतर पोलीस आयुक्त संतोष सिंह यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी प्रकरणाचं गांभीर्य विचारात घेऊन डीसीपी क्राईम ब्रँच राजेश कुमार त्रिपाठी यांच्याकडे तपास सोपवला आहे. ते शिलाँग पोलिसांसोबत सातत्याने संपर्कात आहेत.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी