शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona : हनिमूनहून परतताच पतीला सोडून निघून गेली पत्नी, कोरोनाची लागण झाल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 15:25 IST

संबंधित महिलेचा पती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या महिलेलाही सर्वांपासून वेगळे ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देइटली, ग्रीस आणि फ्रान्सला हनिमूनसाठी गेले होते हे जोडपेपतीची कोरोना टेस्ट आली होती पॉझिटिव्हविलगीकरण कक्षातून पळून गेली होती महिला

आग्रा - कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगातच दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची प्रचिती आग्रा या शहरातही आली. पतीसह इटलीवरून हनिमूनहून बंगळुरूला परतलेली एक महिला, पती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळताच त्याला सोडून निघून गेल्याची घटना घडली आहे. 

संबंधित महिलेचा पती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या महिलेलाही सर्वांपासून वेगळे ठेवण्यात आले होते. मात्र, स्वतःचा आणि हजारो लोकांचा जीव धोक्यात घालून ही महिला विलगिकरण कक्षातून पळाली. एवढेच नाही, तर ती विमानाने दिल्ली आणि नंतर ट्रेनने थेट आग्रा येथे आपल्या माहेरी आली. हे समजल्यानंतर आरोग्य विभागाच्या भूवया उंचावल्या असून संबंधित महिलेचा ट्रॅव्हल रूटही ट्रेस केला जात आहे.

वेगळे होण्यास नकार -या महिलेच्या पतीला कोरोनाचे निदान झाले होते. यानंतर महिलेला वेगळे करण्यात आले होते. मात्र, ही महिला 8 मार्चला बंगळुरूहून दिल्ली आणि नंतर आग्र्याला आपल्या पालकांकडे परतली. यानंतर जेव्हा आरोग्य विभागाचे अधिकारी तिच्या घरी पोहोचले, तेव्हा ती तेथे 8 सदस्यांसोबत राहत असल्याचे आढळून आले. यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी या सर्वांनाच वेगळे राहायला सांगितले. मात्र त्यांनी नकार दिला. यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलिसांना बोलवावून त्यांना वेगळे करण्यात आले.

आग्रा येथील सीएमओ मुकेश कुमार वत्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य अधिकाऱ्यांचा चमू संबंधित महिलेच्या घरी पोहोचला तेव्हा तिच्या वडिलांनी ती बंगळुरूला परत गेल्याची खोटी माहिती दिली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर तिच्या संपूर्ण कुटुंबाला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्याता आले. या महिलेला आता एसएन वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

पतीला कोरोनाची लागण झालेली असतानाही गेली माहेरी -फेब्रुवारी महिन्यात संबंधित महिलेचा विवाह झाला होता. यानंर ही महिला आणि तिचा पती हनिमूनसाठी इटलीला गेले होते. आणि तेथून ते ग्रीस आणि फ्रान्सलाही गेले. यानंर ते 27 फेब्रुवारीला मुंबईला आले आणि येथून बंगळुरूला गेले. 7 मार्चला या महिलेच्या पतीला कोरोना झाल्याचे आढळून आले होते. यानतंर या दोघांनाही वेगळे ठेवण्यात आले होते. ही गोष्ट या महिलेने आपल्या कुटुंबीयांना सांगितली. यानंतर तिच्या वडिलांनी तिला आग्र्याला बोलावून घेतले होते.

बंगळुरूहून दिल्ली मग आग्रा -ही महिला 8 मार्चला विमानाने बंगळुरूहून नवी दिल्लीला आणि नतंर ट्रेनने दिल्लीहून आग्र्याला पोहोचली. आता तिच्या प्रवासाचे तपशील शोधले जात आहेत. या प्रवासादरम्यान तिच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अलिगड वैद्यकीय महाविद्यालयाने संबंधित महिला संशयित असल्याचे म्हटले होते. एका डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे सॅम्पल्स पुण्याच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.