जोडबातमी कॅसिनो...
By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST
(बॉक्स)
जोडबातमी कॅसिनो...
(बॉक्स)कॅसिनो गोव्याची समस्याआमदार खंवटे कॅसिनो मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची कोंडी करीत असताना मुख्यमंत्र्यांनी पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्याकडे बोट दाखवून सांगितले की, ज्यांच्या मतदारसंघात हे कॅसिनो आहेत, ते समस्या विचारत नाहीत व भलतेच प्रश्न करतात. यावर आलेक्स रेजिनाल्ड, विजय सरदेसाई आणि नरेश सावळ झटक्यात उठले आणि कॅसिनो हा पणजीचा नव्हे, तर संपूर्ण गोव्याची समस्या असल्याचे सांगितले.(बॉक्स)कॅसिनोच्या पैशांतून आमदारांना पगारमुख्यमंत्री आणि आमदार खंवटे यांच्यात कॅसिनो मुद्द्यावरून जुंपली असतानाच आमदार किरण कांदोळकर यांनी कॅसिनोद्वारे किती महसूल सरकारला मिळतो, याची माहिती विचारली. तेवढ्यावरही न थांबता विरोधकांना डिवचताना कॅसिनोमुळे मिळालेल्या पगारातून आमदारांना पगार दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. या मुद्द्यावर विरोधक चांगलेच खवळले आणि संयुक्तपणे त्यांनी सरकारवर चढाई केली. सरकारला वर्षाकाठी ८० कोटी रुपये कॅसिनोद्वारे मिळत असल्याचे सांगण्यात आले.