शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

साखर उद्योगात चढउतारांचा मुकाबला करण्यासाठी किंमत स्थैर्य निधी उभारा

By admin | Updated: June 30, 2017 19:15 IST

उसाचे दर, साखरेची निर्यात आणि साखरेच्या भावातील चढउतार अशा आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी एक कायमस्वरूपी किंमत स्थैर्य निधी (प्राईस स्टॅबिलायझेशन फंड) उभारावा

सुरेश भटेवरा/ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 30 - उसाचे दर, साखरेची निर्यात आणि साखरेच्या भावातील चढउतार अशा आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी एक कायमस्वरूपी किंमत स्थैर्य निधी (प्राईस स्टॅबिलायझेशन फंड) उभारावा, वस्तू व सेवा करात केंद्रीय अबकारी कराचा समावेश झाल्यानंतर, शिल्लक राहिलेली 124 रुपये प्रति क्विंटल सेसची रक्कम, शुगर डेव्हलपमेंट फंडात वर्ग करण्याची शिफारस आयोगाने केंद्र सरकारकडे करावी, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ (नॅशनल फेडरेशन आॅफ को आॅपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज)चे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष व्ही.पी. शर्मा यांच्याकडे केली.कृषी मूल्य आयोगाबरोबर झालेल्या बैठकीत 2017/18 तसेच 2018/19 च्या गळित हंगामाच्या संभाव्य परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला. बैठकीत अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी नमूद केले की 2017/18 च्या हंगामात 250 लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. याखेरीज हंगाम अखेरीला 53 लाख टनांचा अपेक्षित शिल्लक साठा लक्षात घेता, भारतात साखर आयातीची गरज भासणार नाही. 2018/19 वर्षात उसाचे वाढीव क्षेत्र, उसाची उपलब्धता, साखरेचा उतारा, ऊस उत्पादकता व साखर उत्पादनाचा अंदाज पहाता, देशात सहकारी साखर कारखानदारीचे अस्तित्व टिकून राहावे, यासाठी केंद्र शासनाने धोरणातले सातत्य दीर्घकालासाठी कायम ठेवणे गरजेचे आहे, अशी आग्रही मागणी फेडरेशनच्या वतीने यावेळी करण्यात आली.देशात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहकारी कारखाने उभे केले आहेत, याची जाणीव ठेवून केंद्र सरकारने संरक्षण विभाग, सार्वजनिक वितरण व्यवस्था, अंत्योदय योजना, इत्यादींसाठी लागणारी साखर सहकारी कारखान्यांकडूनच खरेदी करावी, असे आवाहनही याप्रसंगी दिलीप वळसे पाटील यांनी केले. दिल्लीच्या कृषी भवनात कृषी मूल्य आयोगाबरोबर झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक, प्रकाश नाईक नवरे इस्मा आणि कर्नाटकातील साखर उत्पादकांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.