शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

साथीच्या आजाराने दवाखाने हाऊसफुल!

By admin | Updated: August 9, 2014 22:43 IST

वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजाराने डोके वर काढले असून मोठया प्रमाणात या आजाराचे रूग्ण उपचारासाठी दवाखान्यांमध्ये गर्दी करीत आहेत.

वाशिम : वातावरणातील बदलामुळे जिल्हयात साथीच्या आजाराने डोके वर काढले असून मोठया प्रमाणात या आजाराचे रूग्ण उपचारासाठी दवाखान्यांमध्ये गर्दी करीत आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालयात विविध आजाराचे रूग्ण उपचाराकरिता गर्दी करीत असून नोंदणी करीता रांगा लागत आहेत. खासगी दवाखान्यातही मोठया प्रमाणात गर्दी आहे. वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजारात वाढ होत असल्याने रूग्णालयात गर्दी वाढल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. सद्या पावसाळयाचे दिवस असून या दिवसात स्वच्छता पाळणे अतिशय आवश्यक आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये दररोज शेकडो रूग्णांवर उपचार केल्या जात आहेत. यामध्ये सर्वात जास्त रूग्ण साथीचे आजाराचे दिसून येत आहेत. खोकला, डोकेदुखी, ताप, पोटावर व छातीवर सुज येणे या आजाराचे रूग्णांची संख्या मोठया प्रमाणात असल्याची माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कावरखे यांनी दिली. ग्रामीण भागात पाणी पुरवठा करणार्‍या जलकुंभामध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर करण्यात येत नसल्याने विविध आजाराचे रूग्ण वाढले आहेत. तसेच धुरफवारणी प्रकारचं जिल्हयात होत नसल्याने यामुळे अनेक आजार उदभवत आहेत. यामुळे मेंदुचा हिवताप, उलटया , नाक व तोंडातून रक्त येणे , त्वचेवर डाग पडणे रक्तादाब कमी होणे यासारखे आजार कमी प्रमाणात दिसूनयेत असले तरी यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ग्रामीण भागात धूरफवारणी करणे गरजेचे झाले आहे. तसेच आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी उघडयावरील तळलेले पदार्थ टाळावे, रेफ्रीजेटरमधील खाद्य पदार्थ टाळावे, हवेत प्रदूषणाचे प्रमाण जास्त असल्याने शक्यतो सकाळी घरीच थांबावे. अस्थमा असलेल्या रूग्णांनी विशेष काळजी या दिवसाची घेणे आवश्यक आहे. औषधोपचारांसह योगा व श्‍वसननाचा व्यायाम करावा आणि पाणी शुध्द करून जास्तीत जास्त पिण्याचा सल्ला आरोग्य विभागाच्यावतिने देण्यात आला आहे. शहरातील घाण पाण्यामध्ये एडीस, इजिप्टाय डासांची उत्पत्ती होत असून यापासून डेंगी ताप, मलेरीया, डायरिया, सर्दी , ताप, डोकदुखी, डेंगी, हिमोजिक फिवर, डेंगी शॉक, सिड्रोम या आजाराची लागण होवू शकते . याठिकाणी पालीका प्रशासनाकडून फाँगीग व फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. त्याकरीता नगरपरिषद प्रशासनाने लक्ष देवून नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीबाबत लक्ष ठेवून सदर उपाय योजना करणे आवश्यक आहे. या दिवसात सर्वात जास्त आजाराचा त्रास लहान मुलांना सहन करावा लागत आहे. सद्या जिल्हा सामान्य रूग्णालयात येणार्‍या लहान मुलांना घशात खवखव होणे, डोळे खाजवणे तसेच कान व नाकाच्या आजारांसह सर्दी खोकला व तापाच्या आजारानी ग्रासले आहे. बालकांना श्‍वसनाचा अधिकच त्रास होत असल्याने जिल्हा सामान्य रूग्णालयांसह शहरातील बाल रूग्णालयामध्ये रूग्णांचीसंख्या वाढली आहे. ढगाळ वातावरण , रिमझिम पाऊस, पाऊसाची दडी दोन तीन दिवसानंतर जोराचा पाउस नंतर कडाक्याचे उन्ह व थंडी या वातावरणातील बदलामुळे जिल्हयात तापाच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. खासगीसह जिल्हा सामान्य रूग्णालयात मोठया प्रामाणात गर्दी दिसत असून जिल्हयात सर्वाधिक रूग्ण साथीचे आजाराचे दिसत असल्याचे जिल्हा सामान्य रूग्णालयातील गर्दीवरून दिसून येत आहे.