शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सरदार पटेल पुतळा देखभालीसाठी रोज 12 लाख रुपये खर्च येणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 18:18 IST

पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला असून देखभाल करण्यासाठी रोज 12 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. 

नवी दिल्ली : ऐक्याचे प्रतीक (स्टॅच्यू ऑफ युनिटी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधील 182 मीटर उंचीच्या पुतळ्याचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी विविध राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळासंबंधीची माहिती आता समोर येत आहे. पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला असून देखभाल करण्यासाठी रोज 12 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची देखभाल करण्यासाठी 15 वर्षांचा विचार केल्यास 657 कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे. हाच खर्च वर्षाला 43.8 कोटी रुपये होतो. त्यामुळे पुतळ्याच्या देखभालीसाठी दररोज 12 लाख रुपये इतका खर्च येणार आहे. पुतळ्याची देखभाल करण्यासाठी ओएनजीसी, एचपीसीएल, बीपीसीएल, इंडियन ऑइल आणि ऑइल यांनी मिळून 146 कोटीपेक्षा जास्त रुपये जमा केले आहेत. ही रक्कम त्यांना सीएसआर (Corporate social responsibility) च्या माध्यमातून मिळाली आहे. सरासरी पाहिले तर सीएसआरच्या माध्यमातून मिळणारी ही रक्कम शाळा किंवा रुग्णालये बांधण्यासाठी खर्च केली जाते. 

दरम्यान, सीएसआरमध्ये मोठ्या व्यापाऱ्यांना एक सामाजिक देणगी द्यावी लागते. व्यापाऱ्यांना आपल्या व्यवसायात झालेल्या फायद्यातील दोन टक्के रक्कम समाजाच्या कल्याणासाठी द्यावी लागते. त्यामुळे आता अशा रकमेतून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची देखभाल करण्यात येणार आहे.  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे काम 2013साली नरेंद्र मोदीगुजरातचे मुख्यमंत्री असताना सुरू झाले होते.  ते आता पूर्ण झाले आहे. या पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला आहे. 

 

टॅग्स :Statue Of Unityस्टॅच्यू ऑफ युनिटीGujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदी