शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
5
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
6
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
7
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
8
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
9
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
10
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
11
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
12
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
13
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
14
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
15
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
16
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
17
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
18
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
19
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
20
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा

(सुधारित/ हीच वापरावी) कलबुर्गी यांच्या हत्येची सीबीआय चौकशी कर्नाटक सरकारचा निर्णय : तोपर्यंत सीआयडीकडे सूत्रे

By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST

बेंगळुरू : प्रख्यात कन्नड लेखक आणि पुरोगामी विचारवंत डॉ. एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी सोमवारी सीआयडीकडे तपास सोपविण्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच मंत्रिमंडळाच्या बैठकीत सीबीआयकडे तपासाची शिफारस करण्याचे ठरले. कायदा व संसदीय कार्यमंत्री टी. बी. जयचंद्र यांनी पत्रकारांना मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती दिली. सीबीआयने तपास हाती घेईपर्यंत सीआयडीकडे तपासाची सूत्रे राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

बेंगळुरू : प्रख्यात कन्नड लेखक आणि पुरोगामी विचारवंत डॉ. एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी सोमवारी सीआयडीकडे तपास सोपविण्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच मंत्रिमंडळाच्या बैठकीत सीबीआयकडे तपासाची शिफारस करण्याचे ठरले. कायदा व संसदीय कार्यमंत्री टी. बी. जयचंद्र यांनी पत्रकारांना मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती दिली. सीबीआयने तपास हाती घेईपर्यंत सीआयडीकडे तपासाची सूत्रे राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कलबुर्गी यांची रविवारी धारवाड येथील त्यांच्या निवासस्थानी दोन बंदूकधाऱ्यांनी अगदी जवळून गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया आणि संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान डावे पक्ष आणि समाजवादी पक्षाने हल्लेखोरांच्या त्वरित अटकेसाठी राज्यव्यापी आंदोलन चालविले आहे.
ही घटना घडायला नको होती. डॉ. कलबुर्गी यांची हत्या अत्यंत निंदनीय आहे, असे सिद्दरामय्या यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना म्हटले. कोल्हापूरचे पुरोगामी विचारवंत कॉमे्रड गोविंद पानसरे यांच्याशी निकटचे संबंध राहिलेल्या ७७ वर्षीय कलबुर्गी यांनाही त्याच पद्धतीने संपविण्यात आल्याने संतापाची भावना बळावत आहे. कलबुर्गी हे नेहमी अंधश्रद्धेविरुद्ध बोलायचे.
त्यांनी हिंदू देव-देवतांबद्दल वादग्रस्त विधाने करीत विहिंप आणि बजरंग दलासारख्या कडव्या उजव्या संघटनांचा राग ओढवून घेतला होता. धारवाड येथे सोमवारी असंख्य चाहत्यांनी कलबुर्गी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. दारावर थाप पडली असता ते उघडणाऱ्या कलबुर्गी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अगदी जवळून गोळ्या झाडल्या. त्यांच्या कपाळ आणि छातीत गोळ्या घुसल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. या हत्येप्रकरणी सर्वांगाने तपास सुरू करण्यात आल्याची माहिती कर्नाटकचे गृहमंत्री के.जे. जॉर्ज यांनी दिली आहे.(वृत्तसंस्था)
----------------------------------
वादग्रस्त टिष्ट्वटमुळे खळबळ
हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या यू.आर. अनंतमूर्ती आणि आता एम.एम. कलबुर्गी यांना कुत्र्याचे मरण मिळाले आहे. आता आदरणीय के.एस. भगवान यांचा नंबर लागेल, असे टिष्ट्वट बजरंग दलाच्या बांटवाल सेलचा नेता भूवित शेट्टी याने केल्यानंतर खळबळ उडाली आहे. शेट्टीविरुद्ध मंगळूर
पोलिसांनी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणे आणि गुन्हेगारी कृत्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. मी माझा राग व्यक्त केला असून मी किंवा माझ्या संघटनेतील कुणी त्यांची हत्या केली असा त्याचा अर्थ काढता येत नाही, असा खुलासाही त्याने केला आहे. भगवान यांची वादग्रस्त विधाने पाहता त्यांना हिंदुत्ववादी संघटनांकडून लक्ष्य ठरविले जाऊ शकते. आमच्या संघटनेचे लोक त्यांची हत्या करतील असा त्याचा अर्थ होत नाही, असेही शेट्टीने टिष्ट्वटरवर नमूद केले.