शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित -आरोप मंत्र्यावर; सरकारवर नाही

By admin | Updated: July 19, 2015 21:24 IST

सुधारित -आरोप मंत्र्यावर; सरकारवर नाही

सुधारित -आरोप मंत्र्यावर; सरकारवर नाही
सुधारित -आरोप मंत्र्यावर; सरकारवर नाही
राकेश सिंग : स्वतंत्र चौकशीसाठी सरकारची तयारी
नागपूर : काँग्रेस व विरोधकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमधील काही मंत्र्यांवर आरोप केले आहेत. सरकारवर कोणतेही आरोप नसल्याची क्लीन चिट भाजपचे महाजनसंपर्क अभियानाचे महाराष्ट्राचे सहप्रभारी खासदार राकेश सिंग यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर बोगस पदवीसंदर्भात विरोधी पक्षाने आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी यावर भूमिका स्पष्ट केली आहे. या आरोपाची स्वतंत्र चौकशी करण्याची सरकारची तयारी असल्याचे त्यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनीच दिले होते. यात कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न नाही. उच्च न्यायालयाच्या नियंत्रणात एसआयटी गठित करण्यात आली होती. काँग्रेसच्या काही लोकांनी उच्च न्यायालयाकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. परंतु ही मागणी फेटाळली होती. सवार्ेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआय चौकशी सुरू आहे. कुणाचाही मृत्यू होणे ही घटना चांगली नाही. परंतु सर्वच मृत्यूचा या घटनेसोबत संबंध जोडता येणार नाही. व्यापमं व महाराष्ट्रातील घोटाळ्याच्या आरोपाचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केेले. पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास, शहर अध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे आदी यावेळी उपस्थित होते.
चौकट..
११ कोटींहून अधिक सदस्य
भाजपने सदस्यता नोंदणी अभियान हाती घेतले होते. एसएमएसच्या माध्यमातून १० कोटी सदस्यांचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात ११ कोटींहून अधिक प्राथमिक सदस्यांची नोंदणी करण्यात आली. महाराष्ट्रात १ कोटी ५ लाख तर नागपूर शहरात ६ लाख १३ हजार सदस्यांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
चौकट..
महाप्रशिक्षण शिबिर
पक्षाने महासंपर्क अभियान हाती घेतले आहे. यात केंद्र, राज्य, जिल्हा व विभागस्तरावर १५ लाखांहून अधिक प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात सदस्यांना प्रशिक्षण देणाऱ्यांचाही समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात महाप्रशिक्षण अभियान राबविले जाणार आहे. यात कार्यक र्त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. यानिमित्ताने महाराष्ट्रातील तयारीचा आढावा घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.