शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

्रपोलीस अधीक्षकांची सही ठोकली बोगस!

By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST

सही अन् नावही बोगस: कारवाई कोणी करायची यावरून झेड़ पी़ अन् ग्रामीण पोलिसांत तू-तू मैं-मैं

सही अन् नावही बोगस: कारवाई कोणी करायची यावरून झेड़ पी़ अन् ग्रामीण पोलिसांत तू-तू मैं-मैं
सोलापूर: शिवाजी सुरवसे
तीर्थक्षेत्राचे अनुदान लाटण्यासाठी एका ग्रामपंचायतीने चक्क पोलीस अधीक्षकांचे आणि पोलीस निरीक्षकांचे नाव आणि सही बोगस ठोकून जिल्हा परिषदेला प्रस्ताव सादर केला़ जि़ प़ने तो स्वीकारला़ एका कागदावर पोलीस अधीक्षकांची सही ‘चुकून’ राहिली म्हणून जि़प़ने ती कागदपत्रे पोलीस अधीक्षक कार्यालयास पाठविली़ मात्र ‘शांताराम चव्हाण- पोलीस अधीक्षक’ अन् ‘गोपाळराव पाटील- पोलीस निरीक्षक’ अशी नावे वाचून अधीक्षक कार्यालय चक्रावल़े एवढेच नव्हे तर पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी देखील हा प्रकार पाहिला; मात्र कारवाई कोणी करायची, यावर झेड़ पी़ अन् एस़ पी़ कार्यालयात महिन्यापासून तू-तू मैं-मैं सुरू आह़े
तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळून त्या गावाला शासनाचे अनुदान देण्यासाठी गावाकडून किंवा त्या देवस्थानकडून जिल्हा परिषदेला प्रस्ताव सादर केला जातो़ यामध्ये त्या देवस्थानला यात्रेनिमित्त किती भाविक येतात, याची संख्या दर्शविणारा दाखला पोलीस अधीक्षकांनी द्यावा लागतो़ मात्र प्रस्तावासोबत भलतीच करामत केली आह़े शांताराम चव्हाण असे पोलीस अधीक्षकांचे नाव लिहून तर गोपाळराव पाटील असे तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांचे नाव लिहून त्यावर बोगस स?ा ठोकून प्रस्ताव दिला होता़ मात्र पोलीस निरीक्षकांच्या सहीच्या ठिकाणी देखील पोलीस अधीक्षकांचीच सही लागते म्हणून जि़ प़ने ‘डोळेझाक’पणे काहीही न पाहता ती दोन पत्रे पोलीस अधीक्षकांना पाठवून दुसर्‍या प्रतीवर देखील आपली सही करून द्यावी, असे कळविल़े इथपर्यंत कोणालाही थांगपत्ता लागला नाही; मात्र ही दोन्ही नावे बोगस आहेत आणि स?ा देखील बोगस ठोकल्याचे समजल्यावर पोलीस अधीक्षकांनी तातडीने कारवाई करणे अपेक्षित असताना त्यांनी जि़ प़ला केवळ पत्र देऊन कारवाई करा, असे सुचविले आह़े त्यामुळे या प्रकरणावर अद्याप तरी काहीही झाले नाही़
चौकट़़़
झेड़ पी़तून फाईल गायब
तो प्रस्ताव कार्यकारी अभियंता बांधकाम क्रमांक 1 कडे दाखल होता़ मात्र बोगस स?ा मारल्याचे बिंग फुटल्यामुळे जिल्हा परिषदेतून हा प्रस्तावच गायब केल्याचे समजत़े वास्तविक पाहता आम्ही त्या ग्रामपंचायतीला अनुदान दिले नाही. त्यामुळे आमची फसवणूक झाली नाही, असे जि़ प़ अधिकार्‍यांचे म्हणणे आहे तर बोगस कागदपत्रे झेड़ पी़कडे सादर झाली. त्यामुळे त्यांनीच कारवाई करावी, असे पोलीस अधीक्षक कार्यालयाचे म्हणणे आह़े यामुळे वरिष्ठ अधिकारी किती गंभीर आहेत हे दिसत़े
चौकट़़़
पोलीस अधीक्षकांकडून झेड़ पी़ला पत्र
या गंभीर प्रकाराबाबत पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी सांगितल्यानुसार झेड़ पी़ कडे कारवाईबाबत टपाली पत्र पाठविण्यात आले आह़े महिना झाला तरीही याबाबत कोणतीच कारवाई झाली नाही, म्हणून दुसरे पत्र पाठविले आह़े आता झेड़ पी़ने कारवाई केली नाही तर पोलीस अधीक्षक गप्प बसणार का, हा खरा प्रश्न आह़े