शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविकेच्या पतीकडून टँकर चालकास मारहाण

By admin | Updated: December 20, 2014 23:40 IST

- टँकरचालकांचा संप : ओसीडब्ल्यूकडून गुन्हा दाखल

- टँकरचालकांचा संप : ओसीडब्ल्यूकडून गुन्हा दाखल नागपूर : पारडी प्रभागातील काँग्रेसच्या नगरसेविका कुमुदिनी कैकाडे यांचे पती श्रीकांत कैकाडे यांनी टँकरचालकाला मारहाण केल्यामुळे पूर्व नागपुरातील टँकरचालक संपावर गेले आहेत. यामुळे शनिवारी या परिसरात टँकरने होणारा पाणीपुरवठा खंडित झाला. संबंधित प्रकरणी पाणीपुरवठा कंपनी ओसीडब्ल्यूच्या तक्रारीवरून कैकाडे यांच्या विरोधात कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ओसीडब्ल्यूने दिलेल्या तक्रारीनुसार सुभाननगर जलकुंभावरून नगरसेविका कैकाडे यांनी टँकर मागविले होते मात्र, टँकर पोहचलेच नाही. त्यामुळे कैकाडे यांचे पती श्रीकांत हे दुपारी सुभाननगर जलकुंभावर पोहचले व त्यांनी हाइड्रन सुपरवायजर मनीष भुजभाटकर यांना धक्काबुक्की करीत त्यांना मारहाण केली. या मारहाणीचा निषेध करीत टँकरचालक एकत्र आले व त्यांनी पारडी परिसरात पाणीपुरवठा करण्यास नकार दिला. त्यामुळे शेकडो नागरिकांना टँकरद्वारे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. ओसीडब्ल्यूने दावा केला आहे की, टँकरचालक पारडी परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात व्यस्त होते. कैकाडे मात्र आपल्याच प्रभागात तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी दबाव टाकत होते. त्यानंतर एक टँकर पाठविण्यात आला. मात्र काही नागरिकांनी धार्मिक कार्यकमासाठी संबंधित टँकर स्वत:कडेच थांबवून घेतले. यानंतर संबंधित प्रकार घडला. घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत टँकरने पाणीपुरवठा बंद होता. कैकाडे यांनी माफी मागितल्याशिवाय पाणीपुरवठा करणार नाही, अशी भूमिका टँकरचालकांनी घेतली होती. येथून दररोज ६२ टँकरद्वारे ४३३ फेऱ्या मारल्या जातात. या घटनेमुळे टँकरच्या सुमारे २५० फेऱ्या होऊ शकल्या नाहीत. चौकट...सुपरवायजरने अपमानास्पद वागणूक दिली : कैकाडे याप्रकरणी नगरसेविका कुमुदिनी कैकाडे म्हणाल्या, एका कार्यक्रमासाठी टँकर मागविण्यात आला होता. सुभाननगर जलकुंभावरील सुपरवायजरला फोन करून टँकर पाठविण्यास सांगण्यात आले तेव्हा त्याने आपल्याशी असभ्यपणे संवाद साधला. अपमानजनक वागणूक दिली. त्यानंतर श्रीकांत कैकाडे जलकुंभावर गेले असता त्यांच्याशीही सुपरवायजरने वाद घातला. यातून पुढे वाद निर्माण झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले.