शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

CorpnaVirus: भारतात बाधितांची संख्या ८२ दिवसांनंतर १ वरून वीस हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 07:08 IST

अमेरिका, युरोपात १५-२० दिवसांतच आकडा पार

- विशाल शिर्के पुणे : कोरोनाबाधितांच्या आकड्यात जगभरामधे दररोज हजारोंच्या संख्येने भर पडत आहे. भारतात तब्बल ८२ दिवसांनी कोरोनाबाधितांच्या संख्येने वीस हजारांचा टप्पा पार केला. अमेरिका, इटली, फ्रान्स या देशांच्या तुलनेत भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा तितक्या वेगाने वाढला नसल्याबद्दल भारत सरकारमधील काही व्यक्ती स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. मात्र, चीनबरोबरच बाधित आढळलेल्या जपान, थायलंड, रिपब्लिक कोरिया (दक्षिण कोरिया) या देशांनी कोरोनाची लागण लवकर होऊनही साथीचा फैलाव रोखण्यात यश मिळविले आहे. या देशांनी अजूनही बाधितांचा आकडा १५ हजारांच्या वर जाऊ दिलेला नाही. त्याकडे मात्र, आपले धोरणतज्ज्ञ दुर्लक्ष करत आहेत.चीनमधे डिसेंबर २०१९मधे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याचे आता संशोधनातून पुढे आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा २१ जानेवारी २०२०रोजी पहिला अहवाल जाहीर केला. त्यात जगभरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या २८२ होती. चीनसह चार देशांमधे त्याचा फैलाव होता. एकूण बाधितांपैकी २८२ रुग्ण चीनमध्ये, तर थायलंड २, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला होता.जागतिक आरोग्य संघटनेकडे बुधवारी (दि.२२ ) जगभरात २४ लाख ७१ हजार १३६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी भारतात १९,९९४ रुग्ण असल्याचे म्हटले आहे. भारतातील बाधितांचा आकडा बुधवारीच २१ हजारांच्या वर गेला आहे. त्यात सातत्याने वाढच होत आहे. भारतात पहिला रुग्ण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आढळला. जागतिक आरोग्य संघटनेच्या १ फेब्रुवारीच्या अहवालामध्येदेखील भारतात १ रुग्ण होता. त्यामुळे एकवरून २० हजारांचा टप्पा ओलांडायला भारताला ८२ दिवस लागले आहेत.चीनमध्ये पहिल्या पंधरवड्यातच वीस हजार रुग्णांचा टप्पा पार गेला होता. जगभरातील कोरोना बाधितांची संख्या गुरुवारी दुपारपर्यंत २६ लाख ३० हजारांवर गेली होती. त्यात अमेरिकेची रुग्णसंख्या तब्बल ८ लाख ४२ हजार इतकी होती. अमेरिकेत १ फेब्रुवारी रोजी ७ रुग्ण संख्या होती. त्यानंतरच्या साठ दिवसांत त्यात १ लाख ४० हजारापर्यंत वाढ झाली. युरोपमधे कोरोनाचा विस्फोट दिसत असला, तरी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी रुग्णसंख्या १ फेब्रुवारीला होती. त्यांच्या तुलनेत भारतामध्ये वाढ झालेली नाही, हे खरेच आहे. मात्र एकप्रकारे आपले शेजारी असलेल्या जपान, थायलंड आणि रिपब्लिकन कोरिया या देशांत फैलावाच्या पहिल्या टप्प्यातच रुग्ण आढळूनही या देशांनी प्रसार रोखला आहे, याकडे दुर्लक्ष करता कामा नये.जर्मनीतील रुग्णसंख्या ७ वरून ६१ हजारांवर ६० दिवसांत गेलीइटलीत २ वरून २१ हजारांवर रुग्णसंख्या जाण्यास ४५ दिवस लागलेफ्रान्समधे ६ वरून ४५ हजार रुग्णसंख्या ६० दिवसांत झालीस्पेनमधे १ वरून ८५ हजार रुग्णसंख्या ६० दिवसांत गेलीब्रिटनमधे २ वरून २२ हजारांवर रुग्णसंख्या जाण्यास ६० दिवस लागलेअमेरिकेत ७ वरून १ लाख ४० हजारांवर जाण्यास ६० दिवसांचा कालावधी लागलालोकसंख्या आणि बाधाजगात चीन, भारत आणि अमेरिकेची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यात चीनची १३९ कोटी, भारत २३५ आणि अमेरिकेची ३३ कोटी लोकसंख्या आहे. युरोपात सर्वाधिक बाधित देशांमधे जर्मनीची लोकसंख्या सर्वाधिक ८.३ कोटी असून, ब्रिटनची ६.६६ कोटी आहे. तर, जपानची पावणेतेरा कोटी आहे. युरोप आणि अमेरिकेतच सर्वाधिक फैलाव झाला आहे. लोकसंख्येचा विचार केल्यास महाराष्ट्राचीच लोकसंख्या १२ कोटींच्या वर आहे.देश        १ फेब्रुवारी       १५ मार्च       ३१ मार्च       १५ एप्रिल       २२ एप्रिलभारत            १                 १०७           १,०७          ११,४३९         १९,८८४चीन          ११,८२१        ८१,०४८      ८२,५४५       ८३,७४५        ८४,२८७अमेरिका      ७               १,६७८     १,४०,६४०    ५,७८,२६८    ७,७६,९०७जर्मनी          ७               ३,७९५       ६१,९१३       १,२७,५८४     १,४५,६९४इटली           २               २१,१५७    १,०१,७९३     १,६२,४८८      १,८३,९५७फ्रान्स           ६               ४,४९६      ४३,९७७       १,०२,५३३      १,१६,१५१स्पेन             १                ५,७५३       ८५,१९५      १,७२,५४१      २,०४,१७८ब्रिटन           २                 १,१४४       २२,१४५        ९३,८७७       १,२९,०४८इराण           -                १२,७२९      ४१,४९५        ७४,८७७        ८४,८०२जपान         १७                 ७८०          १,९५३           ८,१००          ११,४९६थायलंड      १९                  ७५           १,५२४           २,६४३          २,८२६द. कोरिया  १२                ८१६२         ९,७८६          १०,५९१         १०,६९४(स्त्रोत : जागतिक आरोग्य संघटना)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या