शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
3
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
4
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
5
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
6
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
7
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?
8
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
9
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
12
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
13
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
14
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
15
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
16
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
17
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
18
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
19
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
20
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?

CoronaVirus News: ...तर कोरोना पुन्हा येणार, पुन्हा येणार, पुन्हा येणार; संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 10:56 IST

CoronaVirus News: कोरोनाचा प्रादुर्भाव कायम; संयुक्त राष्ट्रानं संशोधनानंतर दिला धोक्याचा इशारा

मुंबई: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात ३५ हजार ८७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यातले तब्बल २३ हजारांहून अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रातले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. अनेक भागांत पुन्हा निर्बंध लागू केले गेले आहेत. काही भागांत लॉकडाऊन करावा लागला आहे. एका बाजूला कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसऱ्या बाजूला लसीकरणाचा वेगदेखील वाढवला जात आहे. मात्र संयुक्त राष्ट्रांकडून (UN) दिलेल्या एका गंभीर इशाऱ्यानं सगळ्यांची चिंता वाढली आहे. विस्फोट! देशात कोरोना झपाट्याने वाढतोय, गेल्या 24 तासांत 35,871 नवे रुग्ण, 101 दिवसांनी झाली मोठी वाढकोरोना आता एका हंगामी आजाराच्या स्वरुपात विकसित होऊ शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्रांकडून देण्यात आला दिला आहे. 'कोरोना संकट पुढील काही महिने कायम राहिला, तर मग तो एका हंगामी आजाराच्या रुपात स्वत:ला विकसित करेल. चीनमध्ये कोरोना विषाणू आढळून आल्याच्या घटनेला वर्षभरापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला आहे. या कालावधीत कोरोनाची लसदेखील आली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे,' असं संयुक्त राष्ट्र संघटनेनं म्हटलं आहे.संकटं संपता संपेना! कोरोनापेक्षाही खतरनाक सुपरबगने शास्त्रज्ञांच्या चिंतेत भर; माजवू शकतो हाहाकारकोरोना विषाणूनं हंगामी आजाराचं स्वरुप धारण केल्यास बदलणाऱ्या मोसमात लोकांना त्याच्याशी दोन हात करावे लागतील, असा इशारा यूएननं दिला आहे. संघटनेच्या एका टीमनं कोरोनाचा प्रसार आणि त्यासाठी अनुकूल असणारं वातावरण यासंदर्भात अभ्यास केला. यातून कोरोना विषाणू एक हंगामी आजार म्हणून विकसित होऊ शकेल अशी माहिती समोर आली. श्वासाशी संबंधित विषाणूचा प्रादुर्भाव बहुतेकदा हंगामी असतो. अनुकूल वातावरणात असे आजार हातपाय पसरतात, असं निरीक्षण यूएनच्या १६ सदस्यीय टीमनं संशोधनानंतर नोंदवलं.देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावगेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. मार्चमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गेल्या २४ तासांत देशात ३५ हजार ८७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १७ हजार ७४१ जणांनी कोरोनावर मात केली. १७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १ कोटी १४ लाख ७४ हजार ६०५ पोहोचला आहे. आतापर्यंत १ कोटी १० लाख ६३ हजार २५ जण कोरोनातून बरे झाले असून १ लाख ५९ हजार २१६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला देशात २ लाख ५२ हजार ३६४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ