शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ...अन्यथा लॉकडाऊन ३० एप्रिललाच संपला असता; ३ कारणांमुळे वाढले ३ दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 14:55 IST

coronavirus ३ कारणांमुळे वाढले लॉकडाऊनचे ३ दिवस

नवी दिल्ली: कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदी लॉकडाऊन वाढवतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येईल, असा अंदाज अनेकांकडून वर्तवला जात होता. मात्र मोदींनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. २४ मार्चला देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी तीन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे पुढचा लॉकडाऊन दोन किंवा तीन आठवड्यांचा असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. अन्यथा महिना संपेपर्यंत म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाईल, असं अनेकांना वाटतं होतं. मात्र मोदींनी लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. मोदींनी ३ मेची निवड का केली, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामागे तीन महत्त्वाची कारणं असल्याचं सांगितलं जात आहे.सरकारमधील उच्चपदस्थ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्रानं एकट्यानं घेतलेला नाही. राज्य सरकारांच्या शिफारशी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकार एप्रिलपर्यंतच लॉकडाऊनची घोषणा करणार होतं. मात्र १ मे रोजी जागतिक कामगार दिन आहे. त्यानंतर दोन आणि तीन तारखेला शनिवार, रविवार आहेत. म्हणूनच राज्यांनी लॉकडाऊन तीन दिवस वाढवण्याची शिफारस केली.तीन दिवस लॉकडाऊन वाढवून असा कोणता फायदा होणार, असा प्रश्नदेखील काही जण उपस्थित करत आहेत. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असता, तर सध्याच्या लॉकडाऊनमध्ये १६ दिवसांची भर पडली असती. मात्र ३ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित झाल्यानं आता १९ दिवसांनी लॉकडाऊन वाढला आहे. कोरोनाची लक्षणं दिसण्यासाठी ७ ते १४ दिवसांचा अवधी लागतो. लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आल्यानं कोरोनाची लक्षणं आढळून येण्यास तीन दिवस जास्त मिळतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी