शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : WHO प्रमुखांनी ट्विटरवर लिहिलं 'लव्ह'; लोकांनी विचारलं फक्त शींबरोबरच?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 14:15 IST

डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अदानोम गेब्रेयसस यांनी याबद्दल लव्ह शब्द टाकून अमेरिकेची नाराजी दूर करण्याचा  प्रयत्न केला.

नवी दिल्ली: कोरोना विषाणूमुळे जगभरात हाहाकार माजला असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरल्याचे कारण देत जागतिक आरोग्य संघटनेला दिलेला निधी रोखला आहे. इतकेच नाही तर डब्ल्यूएचओ चीनचे समर्थन करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अदानोम गेब्रेयसस यांनी याबद्दल लव्ह शब्द टाकून अमेरिकेची नाराजी दूर करण्याचा  प्रयत्न केला.अशा वातावरणात डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी बुधवारी रात्री एका शब्दात आपल्या भावना व्यक्त  केल्या, ‘लव्ह’ शब्दाद्वारे ट्विटरच्या माध्यमातून भावनांना वाट मोकळी करून दिली. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक असलेल्या टेड्रोस अदानोम गेब्रेयसस यांचं लव्ह लिहिलेलं ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं असून, त्यावर चित्रविचित्र प्रतिक्रिया आल्या आहेत. कदाचित ते अमेरिकेच्या नाराजीला प्रेमाच्या संदेशाद्वारे दूर करू इच्छित असतील. परंतु सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांनाच ट्रोल केलं आहे. लोकांनी त्यांना पक्षपाती असल्याचं सांगितलं आहे. भारताच्या एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले आहे की, 'शींना माहीत आहे की, डब्ल्यूएचओ आपल्या प्रेमात आहे'.प्रणव महाजन यांनी लिहिले, 'सर्वांवर प्रेम करा. सर्व मानव, सर्व प्राणी आणि सर्व देशांमधील नागरिकांवर प्रेम करा, फक्त एकाच देशाला महत्त्व देऊ नका. टेड्रोस यांच्या ट्विटनंतर लोकांनी त्यांना इतके ट्रोल करण्यास सुरुवात केली की, ट्विटरवर जागतिक आरोग्य संघटनेऐवजी 'वुहान हेल्थ ऑर्गनायझेशन' ट्रेंडिंग सुरू झालं. काही वापरकर्त्यांनी शी आणि टेड्रोस मिठी मारत असल्याचेही मीम्स व्हायरल केले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावात काळात चीनच्या प्रेमात आपण मानवता विसरल्याचीही टीकासुद्धा काही युजर्सनी केली आहे. 

"जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात निधी पुरविला जातो. ज्यावेळी प्रवासावर निर्बंध घातले होते, त्यावेळी त्यांनी माझ्यावर टीका आणि त्याबद्दल असहमती दर्शविली होती. बऱ्याच गोष्टींबद्दल ते चुकीचे होते. ते जास्तकरुन चीनला केंद्रित करत असल्याचे दिसून येते. आमच्याकडून जागतिक आरोग्य संघटनेवर खर्च होणाऱ्या निधीवर नियंत्रण आणत आहोत" असं डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यानंतर आता त्यानंतर ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या