शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Vaccine: भारत इतिहास घडवणार; अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्यावर कोरोना लसीची चाचणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 13:14 IST

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनची या मुलांवर चाचणी करण्यात येत आहे. कानपूरच्या प्रखर हॉस्पिटलमध्ये मंगळवारपासून ही चाचणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देलसीची चाचणी करण्यासाठी तीन गटात मुलांना विभागण्यात आलं आहे. पहिल्या गटात २-६ वयोगटातील मुले. दुसऱ्या गटात ६ ते १२ वयोगट तर तिसऱ्या टप्प्यात १२ ते १८ वयोगटातील मुलांचा समावेशबुधवारी ६ ते १२ वयोगटातील १० मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यातील ५ मुलं पात्र असल्याचं समोर आलं

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी सर्वाधिक धोकादायक असल्याचं सांगितले जात आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आधीच तयारी सुरू केली आहे. २ वर्षाच्या मुलांवर कोरोना लसीची चाचणी ट्रायल करण्यात आली आहे. आतापर्यंत जगात इतक्या छोट्या वयातील मुलावर कोरोना चाचणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मुलांना तीन गटात विभागणी केली आहे. ज्याचे सकारात्मक परिणाम समोर येऊ लागले आहेत.

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनची या मुलांवर चाचणी करण्यात येत आहे. कानपूरच्या प्रखर हॉस्पिटलमध्ये मंगळवारपासून ही चाचणी करण्यात येत आहे. लसीची चाचणी करण्यासाठी तीन गटात मुलांना विभागण्यात आलं आहे. पहिल्या गटात २-६ वयोगटातील मुले. दुसऱ्या गटात ६ ते १२ वयोगट तर तिसऱ्या टप्प्यात १२ ते १८ वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात आला आहे.

अशी झाली लसीची चाचणी

लसीची चाचणी करण्यापूर्वी पहिल्या दिवशी १२ ते १८ वयोगटातील ४० मुलांचे स्क्रिनिंग करण्यात आले. ज्यात २० मुले लसीसाठी तंदरुस्त असल्याचं आढळलं. त्या मुलांना लसीचा डोस दिला. बुधवारी ६ ते १२ वयोगटातील १० मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यातील ५ मुलं पात्र असल्याचं समोर आलं. त्या मुलांनाही लसीचा डोस दिला गेला. त्यानंतर या मुलांना ४५ मिनिटे देखरेखीखाली ठेवण्यात आलं. ज्यातील २ मुलांमध्ये इंजेक्शन घेतलेल्या ठिकाणी सौम्य लाल खूणा दिसून आल्या जी सामान्य मानलं जातं.

इतक्या लहान वयोगटातील जगातील पहिलीच चाचणी

लसीच्या चाचणीचे मुख्य संशोधक बालरोग तज्ज्ञ प्रोफेसर वीएन त्रिपाठी म्हणाले की, २ वर्षाच्या मुलांवर कोरोना चाचणी करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. इतक्या छोट्या वयोगटातील मुलांवर कोरोना लसीची चाचणी कुठेच झाली नाही. आता २ वर्षाच्या मुलावर कोरोना लसीची चाचणी करण्यात येईल असं त्यांनी सांगितले. कानपूरमध्ये आतापर्यंत मोठ्या व्यक्तींवर कोरोना चाचणी झाली होती. रशियाची स्पुतनिक आणि झाइडस कॅडिला लसीची चाचणीही झाली. लस उत्पादन करणाऱ्या अन्य कंपन्या कानपूरमध्ये चाचणी करण्यासाठी प्रयत्नात आहे. कोव्हॅक्सिनचं नेजल स्प्रे पुढील महिन्यात येणार आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या