शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: काही आठवड्यांतच भारतातही लस मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशावाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 07:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाल्यानंतर अनेक अफवा पसरू शकतात. त्यांना जनतेने बळी पडू नये. 

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना लस येत्या काही आठवड्यांत उपलब्ध होण्याची शक्यता असून, वैज्ञानिकांनी हिरवा कंदिल दिल्यानंतर लसीकरण मोहिमेला सुरूवात होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत सांगितले.देशातील कोरोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत मोदी म्हणाले की, कोरोना लसीची किंमत किती असावी, तिचे वितरण कसे करावे यासंदर्भात राज्यांशी चर्चा सुरू आहे. सार्वजनिक आरोग्याचे हित लक्षात घेऊनच यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. कोरोना संसर्गाशी मुकाबला करणारे डॉक्टर व अन्य आरोग्यसेवक, वयोवृद्ध नागरिक आदींना प्राधान्याने कोरोना लस दिली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, अनेक कंपन्यांच्या लसींची नावे सध्या चर्चेत आहेत. मात्र स्वस्त दरातील प्रभावी कोरोना लस विकसित होण्याकडे अनेकांचा कटाक्ष आहे. त्यासाठी जगातील अनेक देशांचे डोळे सध्या भारताकडे लागले आहेत. स्वदेशी बनावटीच्या तीन कोरोना लसीच्या चाचण्या सध्या विविध टप्प्यात आहेत. एकूण ८ कोरोना लसींच्या चाचण्या भारतात सुरू असून त्यांचे उत्पादनही देशात होणार आहे.

अफवांना बळी पडू नका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाल्यानंतर अनेक अफवा पसरू शकतात. त्यांना जनतेने बळी पडू नये. त्याऐवजी कोरोना संसर्ग कसा फैलाविणार नाही याबद्दल जागृती करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी