शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

धक्कादायक!: अदर पुनावालांना 'पॉवरफूल' लोकांच्या धमक्या, म्हणाले - फोन कॉल्स सर्वात वाईट गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 20:53 IST

केंद्र सरकारने सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) सीईओ अदर पूनावाला यांना संपूर्ण देशात ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा दिली आहे. (Adar poonawala)

नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठी लस निर्माता कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा अदर पुनावालां यांचे म्हणणे आहे, की फोन कॉल्स ही सर्वात वाईट गोष्ट आहे. तसेच, कोरोना लशीसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर फोन कॉल्स येत आहेत आणि धमक्याही मिळत आहेत, असेही अदर पुनावाला यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर सत्य बोलल्यास माझे शीर कापले जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. ते द टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. (CoronaVirus vaccine Adar poonawala is getting threats from powerful people says phone calls are the bad thing )

अदर म्हणाले, 'कॉल करणारांमध्ये भारतीय राज्यांतील मुख्यमंत्री, व्यापार मंडळांचे प्रमुख आणि अनेक प्रभावशाली मंडळींचा समावेश आहे. हे लोक फोनवरून कोविशिल्ड लशीचा तत्काळ पुरवठा करा, अशी मागणी करत आहेत. अदर म्हणाले, कोविशील्ड लस मिळविण्याची आशा आणि आक्रामकतेची पातळी अभूतपूर्व आहे. सध्या, कोरोना महामारी पृथ्वीवरील दुसऱ्या क्रमांकांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारत देशात पसरत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर भय आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सातत्याने मृत्यूही होत आहेत.

खूशखबर! रशियन कोरोना लस Sputnik-Vची पहिली खेप भारतात दाखल; जाणून घ्या, किती आहे प्रभावी

पुनावाला यांना केंद्राकडून Y सुरक्षा -केंद्र सरकारने सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) सीईओ अदर पूनावाला यांना संपूर्ण देशात ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा दिली आहे. SII मध्ये Director of Government and Regulatory Affairs प्रकाश कुमार सिंह यांनी 16 एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून पूनावाला यांना संरक्षण देण्याची विनंती केली होती, यानंतर केंद्राने त्यांना संरक्षण दिले.

Shocking News!: रुग्णवाहिकेनं फक्त 4Km साठी घेतले तब्बल 10,000 रुपये, IPSनं शेअर केली पावती!

खरे की खोटे देशाला कळायला हवे – आव्हाडसिरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला लंडनला निघून गेलेत, अशी बातमी आहे. द टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे, की मला धमक्या मिळत आहेत आणि सत्य बोललो तर शीर कापले जाईल. NDTV चे पत्रकार रविष कुमार यांनी सुध्दा या संदर्भात पोस्ट केली आहे. देशाला हे कळायला हवे, की हे खरे आहे की खोटे.

रशियन कोरोना लस Sputnik-V भारतात -कोरोना संकट आणि अनेक गोष्टींबरोबरच लशीच्या तुटवड्याचाही सामना करत असलेल्या भारतासाठी आनंदाची बातमी आहे. रशियन लस स्पुतनिक-V ची पहिली खेप शनिवारी हैदराबादेत दाखल झाली. ही लस कोरोना व्हायरस विरोधत 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे बोलले जाते. लसीकरण कार्यक्रमाची गती वाढविण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच स्पुतनिक -V ला इमेरजन्सी वापराची परवानगी दिली होती.

टॅग्स :Adar Poonawallaअदर पूनावालाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस