शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Coronavirus Updates in India: देशात वाढतायेत मृत्यूचे आकडे; गेल्या २४ तासांत ४,२०९ रुग्ण दगावले, आरोग्य विभाग चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 06:16 IST

आरोग्य मंत्रालयाने केली चिंता व्यक्त : योग्य नियोजन करण्याच्या रुग्णालयांना सूचना

विकास झाडे

नवी दिल्ली : कोरोना रुग्णाच्या मृत्यूच्या आकडेवारीने पुन्हा एकदा चार हजारांचा टप्पा गाठला आहे. मृत्यूची संख्या कमी होणे आणि पुन्हा चार हजारांवर जाणे असे कित्येक दिवस सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत चिंता व्यक्त केली असून रुग्णांच्या शुश्रूषाचे योग्य नियोजन करा, अशा सूचना देशभरातील रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.

गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ४ हजार २०९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे भारताचा कोरोना मृत्यूदर १.११ वरून १.१२ टक्क्यांवर गेला आहे. महाराष्ट्रात ७३८ रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक ५४८, तामिळनाडू ३९७ तसेच दिल्लीत २५२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. देशभरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. मात्र, मृत्यूच्या नोंदी वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोना मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे निर्देश राज्य, केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. दिल्लीत गेल्या २४ तासांमध्ये ३००९ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर ४.७६ टक्क्यांवर आला आहे. गुरुवारी हा दार ५.५० टक्के होता. 

गेल्या २४ तासांमध्ये २ लाख ५९ हजार ५५१ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली. तर ३ लाख ५७ हजार २९५ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ६० लाख ३१ हजार ९९१ झाली आहे. यातील २ कोटी २७ लाख १२ हजार ७३५ रुग्ण हे कोरोना मुक्त झाले आहेत. ३० लाख २७ हजार ९२५ रुग्णांवर (११.६३%) उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत २ लाख ९१ हजार ३३१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ८७.२५ टक्क्यांवर पोहोचला. गेल्या एका दिवसात सक्रिय कोरोना रुग्णसंख्येत १ लाख १ हजार ९५३ ने घट नोंदवण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांतील एकूण कोरोनाबाधितांपैकी ७७ टक्के रुग्ण १० राज्यांत आढळले. त्यात तामिळनाडूत सर्वाधिक ३५ हजार ५७९ रुग्णांची भर पडली. केरळ ३०,४९१, महाराष्ट्र २९,९११, कर्नाटक २८,८६९, आंध्र प्रदेश २२,६१०, प. बंगाल १९,०९१, ओडिशा ११,४९८, राजस्थान ७,६८०, उ. प्रदेश ६,६८१ तसेच आसाममध्ये ६ हजार ५७३ रुग्ण नोंदविण्यात आलेत.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या१) कर्नाटक -  ५,३४,९७५२) महाराष्ट्र  -  ३,८५,७८५३) केरळ   - ३,१८,२२०४) तामिळनाडू - २,६३,३९०५) आंध्र प्रदेश  - २,०९,१३४६) राजस्थान -१,४३,९७४७) प. बंगाल - १,३१,५१०८) उ. प्रदेश - १,१६,४३४

लसीकरण! देशात आतापर्यंत १९ कोटी १८ लाख ७९ हजार ५०३ लसीचे डोस लावण्यात आले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये १४ लाख ८२ हजार ७५४ लोकांचे लसीकरण झाले. आतापर्यंत एकूण ३२ कोटी ४४ लाख १७ हजार ८७० तपासण्या करण्यात आल्या आहेत.यातील २० लाख ६१ हजार ६८३ तपासण्या २४ तासात करण्यात आल्यात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या