शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

देशात कोरोनाने भरवली धडकी! गेल्या 24 तासांत 10,158 नवीन रुग्ण, एका दिवसात 30 टक्क्यांनी वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 10:45 IST

coronavirus updates : देशात एका दिवसात कोरोनाचे 10 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे चिंता वाढली आहे. 

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यात कोरोना हातपाय पसरत आहे. दिल्ली-महाराष्ट्र सारख्या राज्यात धोक्याची घंटा वाजवणाऱ्या धोकादायक कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा भीती दाखवली आहे. देशात आज कोरोना व्हायरसने मोठी झेप घेतली आहे. देशात एका दिवसात कोरोनाचे 10 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे चिंता वाढली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 10,158 नवीन रुग्ण आढळले आहेत, ही संख्या गेल्या बुधवारच्या तुलनेत 30 टक्के जास्त आहे. पॉझिटिव्हिटी रेटमध्येही वाढ दिसून येत आहे. सध्या पॉझिटिव्हिटी रेट 4.42 टक्क्यांवर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 10,158 नवीन प्रकरणे प्राप्त झाल्याने देशात सक्रिय रुग्णांची संख्या 44,998 वर पोहोचली आहे. तर देशातील एकूण कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या आतापर्यंत 4,42,10,127 च्या वर गेली आहे. 

बुधवारी देशात 7,830 नवीन कोरोनाव्हायरस प्रकरणे नोंदवली गेली. सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की, भारतात कोविडचे प्रमाण सातत्याने वाढत आहे आणि पुढील 10-12 दिवस रुग्णांमध्ये वाढ होईल. मात्र, त्यानंतर कोरोनाचा संसर्ग कमी होईल. दरम्यान, वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, सॅनिटायझरचा वापर करण्याचे आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ताप, सर्दी खोकला असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

'हे' आहे कोरोनाचे नवे रूप धक्कादायक गोष्ट म्हणजे, कोरोना रुग्ण संख्या वाढत असतानाच ओमायक्रॉनच्या XBB1.16 या व्हेरिएंटमध्ये म्यूटेशन झाले आहे. यामुळे आता आणखी एक XBB1.16.1 हा व्हेरिएंट समोर आला आहे. आकडेवारीनुसार, दिल्ली, गुजरात आणि हरयाणासह एकूण 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये XBB1.16.1 आढळला आहे. भारतीय सार्स Cove-2 जिनोमिक्स कंसोर्टियमच्या (INSACOG) आकडेवारीनुसार, 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये XBB1.16 व्हेरिएंटचे 1,774 रुग्ण आढळून आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस