फतेहपूर: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट झालेली आहे. मात्र अजूनही दररोज देशात २ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यातच उत्तर प्रदेशातील एका जिल्ह्यात वेगळाच धोका निर्माण झाला आहे. देशातील सर्वात मागास जिल्ह्यांपैकी एक असलेल्या फतेहपूरमध्ये 'रहस्यमय ताप' डोकेदुखी ठरत आहे. यमुनेच्या किनाऱ्यावर असलेल्या ललौली गावात गेल्या महिन्याभरात यामुळे १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.मोठी बातमी! मेड इन इंडिया लस कोवॅक्सिनला धक्का; सीरमच्या कोविशील्डला दिलासारहस्यमय तापामुळे दगावलेल्या १०० पेक्षा अधिक जणांना गावातील १० कब्रस्तानांमध्ये दफन करण्यात आलं. ताप आणि श्वास फुलल्यामुळे ग्रामस्थांचा मृत्यू होत असल्यानं स्थानिकांनी सांगितलं. यापैकी कोणालाही उपचार मिळाले नाहीत. २३ एप्रिलला गावात सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली. या दिवशी ७ जणांचा रहस्यमय तापामुळे मृत्यू झाला. देशात वाढतायेत मृत्यूचे आकडे; गेल्या २४ तासांत ४,२०९ रुग्ण दगावले, आरोग्य विभाग चिंतेतफतेहपूर जिल्ह्यात २६ एप्रिलला पंचायत निवडणुकीचं मतदान पार पडलं. जिल्ह्यातल्या इतर भागांतही प्रचारासोबत प्रादुर्भावदेखील वाढत होता. जिल्हा मुख्यालयापासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बांदा हायवेच्या कडेला असलेल्या ललौली गावातील अनेकांना थंडी, ताप आणि श्वासोच्छवासात अडचणी जाणवू लागल्या.गावचे नवनिर्वाचित सरपंच शमीम अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० एप्रिलला पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला. थंडी ताप वाढल्यानं संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असं मानून ग्रामस्थांनी याकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्यानंतर रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यानंतर दर दिवशी याच लक्षणांसह १-२ जणांचा मृत्यू होऊ लागला.रुग्णांना घेऊन स्थानिकांनी फतेहपूर जिल्हा रुग्णालय गाठलं. मात्र तिथे त्यांना दाखल करून घेण्यात आलं नाही. कानपूर आणि बांदा रुग्णालयांमध्येही उपचार मिळाले नाहीत. काही निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीनं ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करण्यात आली. मात्र ती अपुरी ठरली.
'रहस्यमय ताप' ठरतोय तापदायक; एका गावात एकाच महिन्यात १०० हून अधिक दगावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 09:10 IST