शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Coronavirus: दाहकता! गर्दीमुळं टोकन घेऊन मृतदेहांवर अंत्यसंस्कार; मध्यरात्रीपर्यंत पाहावी लागतेय वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 12:26 IST

कर्नाटकच्या होसापल्यामध्ये अंत्यसंस्कारासाठी टोकन घेऊन वाट पाहावी लागत आहे. दिवसभर रांगेत वाट पाहून मध्यरात्री अंत्यसंस्कार केले जात आहेत.

बंगळुरू – देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे तर मृतांचा आकडाही वाढत आहे. गुजरातपाठोपाठ कर्नाटकमधूनही एक ह्दयद्रावक घटना समोर येत आहे. कोरोना संक्रमणामुळं मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात स्मशानभूमी बाहेर रांगा लावल्या जात असल्याचं दिसून येत आहे. इतकचं नाही तर याठिकाणी होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी आता टोकन पद्धत सुरू करण्यात आली आहे.

कर्नाटकच्या होसापल्यामध्ये अंत्यसंस्कारासाठी टोकन घेऊन वाट पाहावी लागत आहे. दिवसभर रांगेत वाट पाहून मध्यरात्री अंत्यसंस्कार केले जात आहेत. मृतदेहांना घेऊन नातेवाईक टोकनमध्ये वाट पाहत आहेत. सोमवारी संध्याकाळपर्यंत १४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याशिवाय ६ रुग्णवाहिकेतील मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रांगेत होते. स्मशानभूमीतील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, याठिकाणी मृतदेह जाळण्यासाठी दोन चिता आहेत. सोमवारी ३१ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंगळवारी सकाळी ५ पर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. चंद्रकुमार सांगतात की, ऑक्टोबर २०२० पर्यंत याठिकाणी कोरोनाचे १ किंवा २ मृतदेह दिवसभरात येत होते. परंतु मागील काही दिवसांपासून याठिकाणी मृतदेहांची संख्या वाढली. त्यासाठी आता टोकन पद्धत सुरू केली आहे. बंगळुरूमध्ये कोरोनाची दुसरी लाटेने मोठ्या प्रमाणात थैमान घातलं आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. हॉस्पिटलमध्ये अचानक वाढणाऱ्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. १९ एप्रिलला राज्यात ९७ लोकांचा मृत्यू झाला आहे.  

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या१,५६,१६,१३० वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (२१ एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत२,९५,०४१ नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख ८२ हजारांवर पोहोचला आहे. याच दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लसीकरण आणि कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत १२,७१, ००,०००  हून अधिक जणांना कोरोनावरील लस दिली गेली आहे. मृत्यू दरही १.१८ टक्के इतका कमी झाला आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या