शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: देशाच्या राजधानीतच 'लॉकडाऊन'ची ऐशीतैशी; बस स्टँडवर हजारोंची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 22:51 IST

रोजगारच नसल्यानं हजारो लोक घरी जाण्याच्या प्रयत्नात

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. आपल्या घरातच राहा, असं आवाहन मोदींनी देशवासीयांना केलं. मात्र लॉकडाऊनमुळे रोजागरच नसल्यानं कित्येक जण शहरांमधून गावांकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. दिल्लीत आज बस स्टँडवर हजारोंनी गर्दी केली होती. रोजगार नसल्यानं पोट भरायचं कसं, या विवंचनेत असलेले वाहतूक पूर्णपणे ठप्प असतानाही त्यांच्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी २४ मार्चला लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनच्या २१ दिवसांमध्ये घराबाहेर पडू नका, असं आवाहन मोदींनी केलं. मात्र लॉकडाऊनच्या घोषणेमुळे उत्तर प्रदेश, बिहारमधून आलेल्या हजारो स्थलांतरितांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. हातावरचं पोट असल्यानं जगायचं कसं, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाल्यानं ते त्यांच्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे दिल्लीतल्या अनेक बस आगारांमध्ये आज हजारोंची गर्दी पाहायला मिळाली. उपजीविकेसाठी दिल्लीला आलेली हजारो कुटुंब उत्तर प्रदेशातल्या त्यांच्या गावांकडे परतण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा हजारो कुटुंबांनी आज दिल्लीतल्या बस स्टँडवर गर्दी केली. गेल्या काही दिवसांपासून शहरातल्या अनेक स्टँडवर अशीच परिस्थिती पाहायला मिळत होती. अखेर आज दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारनं त्यांच्यासाठी काही बसेसची सोय केली. उत्तर प्रदेश सरकारनं राज्यातील नागरिकांना परत आणण्यासाठी १ हजार बसेसची व्यवस्था केली. तर दिल्ली सरकारनं डीटीसीच्या २०० बसेस उपलब्ध करुन दिल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या