शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

CoronaVirus: तिसरी लाट भारतात घातक सिद्ध होऊ शकते; लंडनमधील डॉक्टर अमित यांनी व्यक्त केले मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 05:18 IST

अमित यांचे म्हणणे असे की, डेल्टा व्हेरिएंट अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत वेगाने पसरतो. तसेच मुलांना प्रभावित करतो. परिणामी मुले या व्हेरिएंटचा फैलाव करणारे बनू शकतात.

- शीलेश शर्मालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोनाची तिसरी लाट भारतात दुसऱ्या लाटेच्या तुलनेत ६० टक्के जास्त घातक सिद्ध होऊ शकते. तिसरी लाट मुलांवर सर्वांत जास्त प्रभाव टाकेल, पण प्राणघातक नसेल, असे लंडनमधील जॉन रेडक्लिफ रुग्णालयाचे डॉक्टर अमित यांचे मत आहे.

अमित यांचे म्हणणे असे की, डेल्टा व्हेरिएंट अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत वेगाने पसरतो. तसेच मुलांना प्रभावित करतो. परिणामी मुले या व्हेरिएंटचा फैलाव करणारे बनू शकतात. अशी संक्रमित मुले कुटुंबातील वयस्कर व इतर सदस्यांना संक्रमित करू शकतात. यातून वाचण्यासाठी स्वत:सह मुले घराबाहेर पडण्यावर कडक बंधने घालावी लागतील आणि कोविड आचारसंहितेचे कठोर पालन करावे लागेल. त्यांचा तर्क होता की, मुलांची प्रतिकारशक्ती बळकट असल्यामुळे ही लाट मुलांसाठी प्राणघातक असणार नाही. डॉक्टर अमित मानतात की, अनलॉक प्रक्रियेदरम्यान भारतात नियम कठोरपणे लागू करण्याची गरज आहे.  मास्क वापरला नाही, आवश्यक तेवढे अंतर राखले नाही आणि फारच आवश्यक नसतानाही घरातून बाहेर पडणे धोकादायक सिद्ध होऊ शकते.

उत्तर प्रदेश डॉक्टर असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि हृदयरोग विशेषज्ञ डॉक्टर के. सी. सूद यांनी म्हटले की, तिसरी लाट हृदयाच्या रोग्यांना जास्त धोकादायक होऊ शकते. 

डेल्टा व्हेरिएंटमुळे ४० हजार संक्रमित ब्रिटनचे उदाहरण देताना सूद म्हणाले की, डेल्टा व्हेरिएंटच्या कारणामुळे ४० हज़ार लोक आतापर्यंत संक्रमित झाले आहेत आणि आतापर्यंत त्याचा कहर सुरूच आहे. आमच्या येथे अनलॉकनंतर सर्व काही खुले झाले आहे आणि लोक अतिशय बेजबाबदारपणे वागत आहेत. हे वर्तन तिसऱ्या लाटेला आमंत्रण देईल. प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन लोकांना कोरोनाचे नियम पाळण्यास भाग पाडले पाहिजे, असे ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या