शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

Coronavirus: देशात ३० जूनपर्यंत 'लॉकडाऊन' असावे, 'या' राज्य सरकारने मांडली सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 16:34 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट बैठक घेऊन लॉकडाऊनच्या वाढीसंदर्भात आणि कोरोनाच्या प्रादुर्भावातील देशातील परिस्तितीबाबत चर्चा केली. तसेच, सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतही मोदींनी लॉकडाऊन कालावधी

कोची - चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्यानंतर हळूहळू कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. देशामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र, देशातील सर्वच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून येते. त्यामुळेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन असल्याची घोषणा केली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह देशातील दिग्गज राजकीय नेत्यांनाही या परिस्थितीला कठीण प्रसंगातून सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे, आता लॉकडाऊन नेमकं कधी संपणार, याचीच चर्चा रंगली आहे. पण, लॉकडाऊन कालावधी वाढविण्यात यावा, अशी मागणी अनेक राज्य सरकारकडून होत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट बैठक घेऊन लॉकडाऊनच्या वाढीसंदर्भात आणि कोरोनाच्या प्रादुर्भावातील देशातील परिस्तितीबाबत चर्चा केली. तसेच, सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतही मोदींनी लॉकडाऊन कालावधी आणि इतर उपाययोजना याबाबत संवाद साधला. देशातील बहुतांश राज्य सरकारने लॉकडाऊन कालावधी वाढण्याची सूचना केल्याची माहिती आहे. देशातील परिस्थिती पाहून टप्प्या-टप्प्याने लॉकडाऊन कमी करताना देशात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन ठेवण्याची सूचना केरळ राज्य सरकारने मांडली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वच राज्यांच्या राज्य सरकारला लॉकडाऊन संदर्भात सूचना देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, केरळ सरकारच्या उच्चस्तरीय समितीच्या सूचनेनुसार, विविध राज्यात कोरोना व्हायरसचे संक्रमण वेगवेगळ्या स्तरावर दिसून येत असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्याआधारेच समितीने लॉकडाऊन संदर्भात प्रस्ताव सादर केला आहे. या समितीचे प्रमुख केरळचे माजी मुख्य सचिव आणि भारतीय सुरक्षा एक्सचेंज बोर्ड (सेबी) चे सदस्यही आहेत. या समितीने अनेक प्रकारे चाचपणी आणि संशोधन केले आहे. त्यामध्ये, आरोग्य, नागरिक, अर्थव्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था याचा अभ्यास करण्यात आला आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात हवे तेवढ यश आले नसल्याने ३० जूनपर्यंत लॉकडाऊन ठेवण्याची सूचना या समितीने मांडली आहे. त्यांसंबधी काही नियम आणि अटीही या समितीने दिल्या आहेत. 

घरातून बाहेर पडताना मास्क लावणे अनिवार्य असणार आहे. लग्नसोहळ्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक, पण लग्नाला २५ पेक्षा जास्त लोकं नसावेत. सर्वच कामकाज कार्यालय, खासगी गाड्या आणि परिवहन मंडळाच्या वाहतूकीमध्ये एसी बंद ठेवण्यात यावे. ५ पेक्षा अधिक कोरोना संक्रमित गाव, परिसर हा हॉटस्पॉट म्हणून घोषित करावा. तसेच, या संबंधित गावांमध्ये १०० पेक्षा अधिक लोकं संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेली असावीत,हॉटस्पॉट विभागांना पूर्णपणे बंद ठेवण्यात यावे, प्रशासनाने हा भाग सील करावा. आपात्कालीन परिस्थीत पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन मदतकार्य करावे. हॉटस्पॉट नसलेल्या भागात १५ एप्रिलनंतर तीन टप्प्यात लॉकडाऊन कमी करण्यात यावे. धार्मिक कार्यक्रम आणि आयोजित उपक्रमांना बंदी,  अंत्यसंस्काराला १० पेक्षा अधिक नागरिक असू नयेत

केरळ उच्चस्तरीय समितीने या शिफारसींसह ३० जूनपर्यंत देशात लॉकडाऊन ठेवण्याची सूचना मांडली आहे, याबाबत बीसीसी हिंदीने वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीKeralaकेरळdelhiदिल्ली