शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: 'हे' राज्य ठरलं देशातील पहिलं, जिथं मुख्यमंत्र्यांसोबत सर्व मंत्र्यांची केली 'कोरोना टेस्ट'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 15:51 IST

आज घेण्यात आलेले कोरोना टेस्टचे रिपोर्ट शुक्रवारी मिळणार आहेत.

पुडुचेरी : पुडुचेरीमध्ये मुख्यमंत्र्यांसमवेत खासदार आणि आमदारांची कोरोना टेस्ट गुरुवारी करण्यात आली. देशातील पुडुचेरी पहिले राज्य आहे, ज्याठिकाणी विधानसभेत मुख्यमंत्र्यासोबत सर्व नेत्यांची कोरोना टेस्ट झाली आहे. 

एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, पुडुचेरी विधानसभेत गुरुवारी मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी, विधानसभा अध्यक्ष व्ही. पी. शिवकोलुंडू यांच्यासह सर्व मंत्री, खासदार आणि आमदारांची कोरोना टेस्ट करण्यात आली. कोरोनाची टेस्ट करण्यासाठी आरोग्य विभाग आणि डॉक्टरांचे एक पथक विधानसभा परिसरात दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्यासह सर्व मंत्र्यांचे स्वॅब घेण्यात आले.

आरोग्य विभागाच्या सुत्रांनी सांगितले की, या मंत्र्यांचे आज घेण्यात आलेले कोरोना टेस्टचे रिपोर्ट शुक्रवारी मिळणार आहेत. दरम्यान,  याआधी राज्याचे आरोग्यमंत्री मल्लादी कृष्ण राव यांनी बुधवारी (२२ एप्रिल) पत्रकार परिषदेत सांगितले होते की, "मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्यासह त्यांचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार आज (23 एप्रिल) विधानसभा परिसरात कोरोनाची टेस्ट करतील."

पुडुचेरीमध्ये आतापर्यंत कोरोना बाधित सात रुग्ण आहेत. यापैकी तीन जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे पुडुचेरीमध्ये देशातील इतर राज्यांपेक्षा कोरोनाग्रस्तांची संख्या फारच कमी आहे. मुख्यमंत्री नारायणसामी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रशासित प्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणल्याप्रकरणी राज्य सरकारचे कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी म्हणाले, "पुडुचेरीमधील कोरोनोच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी फोनवर संपर्क साधला. त्यावेळी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच्या रूग्णालयात फक्त तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, असे मी त्यांना सांगितले. तसेच, आरोग्य आणि इतर विभागांनी संयुक्तपणे घेतलेल्या निर्णयांची त्यांना सविस्तर माहिती दिली. ज्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याची कामगिरीची चांगली झाली." 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या