शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: "मोदींचं पॅकेज म्हणजे निव्वळ फसवणूक; ते राज्यांना भिकाऱ्यासारखं वागवताहेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 15:07 IST

पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर टीकास्त्र

हैदराबाद: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं आर्थिक पॅकेज, केंद्राकडून राज्यांना मिळणारी वागणूक यावरुन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तीव्र शब्दांत भाष्य केलं आहे. मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज म्हणजे निव्वळ फसवणूक आहे. त्यातून त्यांनी केवळ आकड्यांचा खेळ केला आहे, अशा शब्दांत राव यांनी तोंडसुख घेतलं. केंद्राकडून राज्यांना भिकाऱ्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. 'मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज म्हणजे केवळ हवा आहे. केंद्रानं स्वत:ची प्रतिष्ठा कमी करुन घेतली आहे,' असा आरोप करत राव यांनी वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्यांतर्गत राज्यांना घेता येणाऱ्या कर्जाचा संदर्भ दिला. राज्यांना कर्ज घेण्यासाठी असलेल्या अटी वाढवण्यात आल्याचं राव यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थमंत्र्यांना जीडीपी वाढवायचा होता की मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींपर्यंतच्या पॅकेजपर्यंत पोहोचायचं होतं, असा सवाल त्यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तांचा दाखला देत विचारला.'केंद्र सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज अतिशय क्रूर आहे. त्यामधून सामंतशाही आणि हुकूमशाही दिसते. आम्ही याचा निषेध करतो. आम्ही केंद्राकडे असं पॅकेज मागितलं नव्हतं,' असं राव म्हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत केंद्रानं घेतलेल्या अनेक निर्णयांचं राव यांनी स्वागत केलं आहे. मात्र पॅकेजमुळे निराशा झाल्याचं मत राव यांनी व्यक्त केलं. कोरोनामुळे राज्यांचा महसूल घटला आहे. त्यामुळे राज्य सरकारांना निधीची आवश्यकता आहे, असं राव म्हणाले. लोकांपर्यंत विविध माध्यमांतून मदत पोहोचवण्यासाठी आम्ही तुमच्याकडे निधी मागत आहोत. मात्र तुम्ही आम्हाला भिकाऱ्यासारखं वागवता. केंद्राचं काम काय असतं? देशात अशाप्रकारे सुधारणा राबवल्या जातात का?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. केंद्रानं जे काही जाहीर केलं त्याला पॅकेज म्हणायचं का, असा प्रश्न मला पडला आहे. संघराज्य पद्धतीत अशा प्रकारचं धोरण असू शकत नाही, असं राव म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी