शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

CoronaVirus News: पीएम केअर्समधून आतापर्यंत किती रुपये खर्च?; मोदी सरकारनं पहिल्यांदाच दिली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 8:55 AM

पीएम केअर्समधील जमाखर्चाचा तपशील जाहीर करण्याचं आवाहन विरोधकांनी केलं होतं

नवी दिल्ली: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मोदी सरकारनं पीएम केअर्स फंड सुरू केला. याबद्दलचा तपशील जाहीर करण्याचं आव्हान विरोधकांकडून दिलं जात होतं. पीएम केअर्सचं ऑडिट करण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधींनी केली होती. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयानं पीएम केअर्स फंडामधून करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील जाहीर केला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी पीएम केअर्समधून ३१०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. पीएम केअर्समधील ३१०० कोटी रुपये आतापर्यंत विविध वैद्यकीय साहित्याच्या खरेदीसाठी देण्यात आले आहेत. यातील २००० कोटी रुपये व्हेंटिलेटर खरेदीसाठी दिले गेले आहेत. एक हजार कोटी रुपये प्रवासी मजुरांच्या व्यवस्था करण्यासाठी देण्यात आले आहेत. तर १०० कोटी रुपये कोरोनावरील लसीवर खर्च केले जाणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मोदींनी पीएम केअर्स फंड सुरू केला. यामध्ये सढळ हस्ते दान करण्याचं आवाहन मोदींनी केलं होतं.२७ मार्च २०२० रोजी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखाली पीएम केअर्स फंडाची सुरुवात झाली. या ट्रस्टमध्ये संरक्षणमंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्र्यांचा समावेश आहे. पीएम केअर्समध्ये जमा केलेल्या रकमेबद्दल मोदींनी जनतेचे आभार मानले. कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी, वैद्यकीय सेवा वाढवण्यासाठी पीएम केअर्समधील निधीचा वापर करण्यात येईल. यामधून ५० हजार व्हेंटिलेटर खरेदी केले जाणार आहेत. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या कोविड-१९ रुग्णालयांना व्हेंटिलेटर दिले जातील. स्थलांतरित मजूर आणि गरिबांच्या कल्याणासाठी पीएम केअर्समधून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना १ हजार कोटी रुपये दिले जातील. यामधून मजुरांच्या राहण्याची, खाण्याची, वैद्यकीय उपचारांची सोय केली जाईल. याशिवाय १०० कोटी रुपये लसीवर संशोधन करण्यात देण्यात आले आहेत. देशातल्या जनतेनं पीएम केअर्समध्ये मोठ्या प्रमाणात दान केलं आहे. जनतेनं दिलेला पैसा जनतेच्याच कामी येईल. त्यामुळे यात सढळ हस्ते दान करण्याचं आवाहन मोदींनी केलं होतं....म्हणून ईडी, सीबीआयसारख्या राजकीय संस्थांचे लॉकडाऊन करा; शिवसेनेची मोठी मागणीनीरव मोदीने मला मारुन टाकण्याची धमकी दिली; ब्रिटीश कोर्टात ‘त्या’ व्यक्तीचा व्हिडीओ सादरविधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या