शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोनाच्या संकटात राहुल गांधींची मोदी सरकारकडे मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 18:26 IST

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही कोरोनावरून मोदी सरकारला वेळोवेळी सल्ला देत असल्याचं आपण पाहिलंच आहे. राहुल गांधींनी आता मोदी सरकारकडे एक मागणी केली आहे.

नवी दिल्लीः देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी सरकार आपापल्या स्तरावर ठोस उपाययोजना करत आहे. पण तरीही कोरोनावर पूर्णतः नियंत्रण मिळवणं शक्य झालेलं नाही. कोरोनाच्या लढ्यात विरोधी पक्षही सत्ताधाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचं सध्या चित्र आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही कोरोनावरून मोदी सरकारला वेळोवेळी सल्ला देत असल्याचं आपण पाहिलंच आहे. राहुल गांधींनी आता मोदी सरकारकडे एक मागणी केली आहे. मोदी सरकारनं कोरोनासारख्या महारोगराईच्या उपचारात वापरण्यात येणाऱ्या छोट्या-मोठ्या उपकरणांना जीएसटी मुक्त करण्याची मागणी केली आहे.राहुल गांधींनी ट्विट करत सरकारकडे कोरोनाच्या लढ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वच छोट्या-मोठ्या उपकरणांवर जीएसटी वसूल केला जाऊ नये. या महारोगराईदरम्यान ही उपकरणं जीएसटीमुक्त करायला हवीत. रोगराई आणि गरिबीचे चटके सोसत असलेल्या जनतेला सॅनिटायझर, साबण, मास्क, हातमोजे यांसारख्या वस्तूंना जीएसटीतून सूट द्यावी. त्यावर जीएसटी आकारणं चुकीचं आहे. कोरोनाच्या लढ्यातील उपकरणं जीएसटीतून मुक्त करण्याच्या मागणीवर आम्ही कायम आहोत.  भारताच्या सीमेपलीकडील देशांकडून करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीच्या नियमात बदल केल्यानंतरही राहुल गांधींनी नरेंद्र मोदी सरकारचे आभार मानले होते. मी दिलेल्या इशाऱ्याची मोदी सरकारनं गंभीर दखल घेऊन एफडीआयमध्ये केलेल्या बदलासंदर्भात मी आभारी आहे. 

गेल्या 24 तासांत 1553 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, तर 36 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 17265 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आहे. देशातील 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 59 जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 28 दिवसांत पुदुचेरीमधील माहे आणि कर्नाटकातील कोडागु आणि उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. गोवा राज्य पूर्णपणे कोरोना मुक्त झाले आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्या