शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : शाहीनबागेवर अखेर पोलिसांची कारवाई, सर्व आंदोलकांना हटवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 08:53 IST

15 डिसेंबरपासून शाहीनबाग येथे सुरू होते CAA आणि NRC विरोधात आंदोलन.

नवी दिल्ली -  नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे सुरू असलेल्या आंदोलनावर अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर शाहीनबाग येथील आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलीस आणि प्रशासनाने केली होती. मात्र सर्व विरोध झुगारुन देत येथील महिलांनी निर्धाराने हे आंदोलन सुरू ठेवले होते. अखेरीस आज सकाळी दिल्ली पोलिसांनी शाहीनबाग येथे दाखल होत आंदोलकांना घटनास्थळावरून हटवले. तसेच आंदोलकांचे साहित्यही हटवले.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे 15 डिसेंबरपासून  आंदोलन सुरू होतो. येथील आंदोलकांमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. आंदोलन सुरू झाल्यापासून सरकार आणि आंदोलकांकडून ताठर भूमिका घेण्यात आल्याने हे आंदोलन सुमारे तीन महिन्यांपर्यंत लांबले होते.दरम्यान, देशात कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाहीनबाग येथील आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र आंदोलकांनी ही विनंती धुडकावून लावली होती. मंगळवारी सकाळपासूनच आंदोलन स्थळावर महिलांनी जमण्यास सुरुवात केली होती. अखेरीस पोलिसांनी आंदोलकांना आणि त्यांच्या साहित्यास घटनास्थळावरून हटवले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNew Delhiनवी दिल्ली