शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: गरजूंच्या मदतीला पारले धावणार; ३ कोटी बिस्कीट पुडे मोफत वाटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 22:03 IST

coronavirus उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेल्यांना पारले देणार मदतीचा हात

मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवस लॉकडाऊन पाळला जाणार असल्याची घोषणा कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. या काळात अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सर्वच कार्यालयं बंद असणार आहेत. या लॉकडाऊनचा फटका हातावर पोट असलेल्या कित्येक गरजूंना बसणार आहे. याच गरजूंच्या मदतीसाठी आता पारले कंपनी धावून आली आहे. सरकारी विभागांच्या मदतीनं पारले ३ कोटी बिस्कीट पुड्यांचं मोफत वाटप करणार आहे.  देशभरात लॉकडाऊन सुरू असल्यानं सध्या कंपनीतला ५० टक्के कर्मचारी वर्गच कार्यरत असल्याचं पारलेनं सांगितलं. मात्र बाजारात पुरेसा साठा उपलब्ध राहावा, यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय लॉकडाऊनचा फटका बसलेल्या गरजूंना कंपनीतर्फे मोफत बिस्कीट पुड्यांचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती पार्ले प्रॉडक्टचे वरिष्ठ प्रवर्ग प्रमुख मयांक शहा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली.आम्ही सरकारबरोबर काम करण्याचे ठरवलंय. सरकारी यंत्रणेमार्फत बिस्किटांचे तीन कोटी पुडे पुढील तीन आठवड्यांत गरजू लोकांना वाटण्यात येतील. प्रत्येक आठवड्यामध्ये एक कोटी असे तीन आठवड्यांमध्ये तीन कोटी पुडे कंपनीमार्फेत दिले जाणार आहेत, असं शहा यांनी सांगितलं.ते पुढे म्हणाले की, सध्या लोकांना अन्नधान्याची गरज आहे. त्यामुळे त्यांचं पोट भरण्याला प्रथम प्राधान्य आहे. कारण रोजगार थांबल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेसोबत कोणी उपाशी राहू नये यासाठी आम्ही काम करणार आहोत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या