शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: संसर्गाच्या भीतीने पर्यटकांनी फिरविली खजुराहोकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 02:49 IST

सर्व हॉटेल रिकामी; सगळ्यांचे व्यवसाय आले अडचणीत

भोपाळ : शाळा, महाविद्यालयांच्या सुट्या लागताच देशभरात पर्यटन वाढते. मध्य प्रदेशातील खजुराहोलाही पर्यटकांची एकच गर्दी होते. तिथे आलेले हजारो पर्यटक खजुराहोनंतर राज्यातील अनेक पर्यटनस्थळांना भेटी देतात. पण यंदा शाळा-महाविद्यालये सुरू झाली नसली तरी नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. पण कोरोनामुळे तब्बल ७५ दिवसांची सुटी असूनही यंदा खजुराहोला पर्यटक आलेच नाहीत. त्यामुळे येथील हॉटेल रिकामी आहेत आणि पर्यटन आणि पर्यटकांवर अवलंबून असलेले सर्व व्यवसाय आणि छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.मार्चपासून रेल्वेगाड्या बंद झाल्या. बराच काळ विमानसेवाही बंद होती आणि बसेसही लोकांविना रस्त्यांवर उभ्या होत्या. या ७५ दिवसांत त्यामुळे राज्याबाहेरील वा परदेशी पर्यटक तर सोडाच, पण मध्य प्रदेशातील कोणीही खजुराहोला आले नाही. उन्हाळ्याच्या काळात विवाहांचे अनेक मुहूर्त असतात आणि त्यामुळे बरीच जोडपी खजुराहोला हमखास येतात. पण यंदा लॉकडाऊ न आणि निर्बंधांमुळे विवाहही पुढे ढकलले गेले. काहींनी केवळ घरच्या मंडळींच्या उपस्थितीतच विवाह केले. पण त्यानंतर जोडप्यांना हनिमूनला वा फिरायला जाण्याची संधीच मिळाली नाही.मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून खजुराहो आणि परिसरातील सर्व हॉटेल बंद आहेत आणि पर्यटनावर अवलंबून असलेले सुमारे अडीच लाख लोक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. आता हळूहळू निर्बंध उठण्यास सुरुवात झाली असली तरी पावसाळा सुरू होत असल्याने आणि अद्यापही कोरोना विषाणूच्या संसर्गाची भीती असल्याने या काळात पर्यटक येण्याची शक्यता अजिबातच नाही. पर्यटनाचे तीन महिने आम्ही घरीच बसून काढले आणि दिवाळीपर्यंत तरी स्थिती सुधारेल का, हे सांगता येत नाही, असे अनेक दुकानदार, छोटे व्यावसायिक यांनी बोलून दाखविले. (वृत्तसंस्था)एकही विदेशी दिसला नाहीगेल्या तीन महिन्यांत आम्ही एकही परदेशी पर्यटक वा व्यक्ती पाहिली नाही, असे एका व्यावसायिकाने सांगितले. तो म्हणाला, खजुराहोहून भोपाळ३५0 किलोमीटर अंतरावर आहे. पण विमानसेवाच बंद होती. त्यामुळे कोणी इथे फिरकलेच नाही. शिवाय जगभर कोरोनाचा कहर असताना आणि जगभरात विमानसेवा बंद असताना परदेशी लोक येथील, अशी अपेक्षा ठेवणेही चुकीचेच होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या