शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus :  जेथे आहात तेथेच राहण्याचे देशातील १० लाख जवानांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 04:54 IST

coronavirus : हे आदेश मुख्यालयातून सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस, सशस्त्र सीमा बल आणि नॅशनल सिक्युरिटी गॉर्ड यांना फारच मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा उपद्रव होऊ नये यासाठी दिले गेले आहेत.

नवी दिल्ली : देशातील १० लाख संख्येतील निमलष्करी दलांना ५ एप्रिलपर्यंत रजेतील प्रवास किंवा तुकड्यांच्या हालचाली किंवा नियमित सरावासाठीचा प्रवास तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले गेले आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार या दलांमध्ये होऊ नये म्हणून ‘तुम्ही जेथे आहात तेथेच राहा’ यासाठी हा आदेश असल्याचे अधिकाऱ्याने रविवारी सांगितले.या दलांतील अधिकारी व जवानांना हे सांगण्यात आले आहे की, तुमच्या कुटुंबातील कोणीही गेल्या काही दिवसांत परदेश प्रवास केलेला नाही किंवा केला असल्यास त्यांची तपासणी करून घ्यावी लागेल किंवा परिस्थिती पाहून त्यांना वेगळे ठेवावे लागेल, अशी माहिती लेखी नमुन्यात द्यायची आहे.हे आदेश मुख्यालयातून सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस, सशस्त्र सीमा बल आणि नॅशनल सिक्युरिटी गॉर्ड यांना फारच मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा उपद्रव होऊ नये यासाठी दिले गेले आहेत.या दलांकडे दहशतवादविरोधी कारवायांसह सीमांवर पहाºयाची व देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी आहे. ही दले सीमेवरील छावणी भागांजवळ राहतात आणि कोरोनाची बाधा झालेला एकही रुग्ण अगदी कमी वेळेत शेकडो जणांना बाधित करू शकतो. त्यामुळे दलांतील कोणीही नित्याच्या कर्तव्यासाठी, रजेतील किंवा रजा संपल्यामुळे कर्तव्यावर परतण्यासाठी ५ एप्रिलपर्यंत प्रवास करू नये, असे सांगण्यात आले. या आदेशाचा ५ एप्रिलनंतर आढावा घेतला जाईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या