शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: क्वारंटाईनमधून सूट मिळण्यासाठी हवाई प्रवासी करू शकतील ऑनलाईन अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 01:44 IST

दिल्ली विमानतळावर सुविधा; राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचा सहभाग

नवी दिल्ली : दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. आणि जीएमआर समूहाच्या नेतृत्वाखालील कंसॉर्टियमने एक पोर्टल विकसित केले असून त्यावर अनिवार्य स्व-घोषित अर्ज भरून आंतरराष्ट्रीय प्रवासी अनिवार्य संस्थात्मक विलगीकरणातून (क्वारंटाईन) सूट मिळविण्याची विनंती करू शकतील.आॅनलाईन अर्ज नागरी उड्डयन मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांच्या सहयोगाने विकसित करण्यात आला आहे. यात दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, हरियाणा, उत्तराखंड आणि मध्यप्रदेश यासारख्या राज्यांचा समावेश आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ही सुविधा ८ आॅगस्ट २०२० पासून भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना उपलब्ध असेल. आॅनलाईन स्व-घोषणेच्या आधारे अधिकारी विलगीकरणाचा निर्णय घेतील.भारतात येणाºया आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरोग्य तपासणी बंधनकारक आहे. यात थर्मल टेम्परेचर स्क्रिनिंग आणि मास स्क्रिनिंग यांचा समावेश आहे. हे पोर्टल संपर्करहित असल्यामुळे प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित असेल, कारण आगमन पश्चात अर्ज भरण्याची गरज त्यांना राहणार नाही. भारताने अनेक देशांसोबत एअर बबल स्थापित केला असल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या वाढत आहे.यात प्रवाशांना ७२ तास आधी दिल्ली विमानतळाच्या वेबसाईटवर अर्ज भरावा लागेल. पासपोर्टसह इतर सहायक दस्तावेजांच्या प्रती त्यासोबत जोडाव्या लागतील. त्यामुळे प्रत्येक वेळी हे दस्तावेज विभिन्न प्राधिकरणांकडे सादर करण्याची गरज राहणार नाही. हे दस्तावेज संबंधित राज्य सरकारांना आॅटो रूट केले जातील.कोरोना टेस्ट करा, क्वारंटाईनमधून सूट मिळवाजयपूर : विदेशातून येणाºया अनिवासी राजस्थानी व्यक्तींना सात दिवसांच्या सक्तीच्या क्वारंटाईनमधून वाचण्यासाठी एक योजना राजस्थान सरकारने आणली आहे. त्यासाठी प्रवाशांना स्वत:ची कोरोना टेस्ट करावी लागेल. टेस्ट निगेटिव्ह आल्यास प्रवाशांना थेट घरी जाता येईल. देशांतर्गत विमान प्रवाशांनाही राजस्थान सरकारने अशीच सवलत दिली आहे. आधी सर्वच प्रवाशांना क्वारंटाईन बंधनकारक होते.देशांतर्गत प्रवाशांसाठी राजस्थानात १४ दिवस होम क्वारंटाईन करण्याचा नियम होता. यात आता बदल करण्यात आला आहे. क्वारंटाईन ऐच्छिक करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या