शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

Coronavirus: दिलासादायक! सलग ९ दिवस बळींची संख्या हजाराखाली; रुग्णवाढीचा आकडाही उतरणीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 11:45 PM

एकूण रुग्णसंख्या ७१ लाखांवर; बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ८६ टक्के

नवी दिल्ली : देशामध्ये दररोजच्या रुग्णवाढीचा आकडा उतरणीला लागला असून, गेल्या सलग नऊ दिवसांपासून कोरोना बळींची संख्याही एक हजारहून कमी आहे. सोमवारी कोरोनाचे ६६,७३२ नवे रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णांची संख्या ७१ लाखांवर पोहोचली आहे. तर ६१ लाख लोक या आजारातून बरे झाले असून त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ८६.३६ टक्के आहे.

रविवारी कोरोनामुळे ९१८ जण मरण पावले होते. सोमवारी हाच आकडा ८१६ इतका आहे. त्यामुळे कोरोना बळींची संख्या आता १,०९,१५० वर पोहोचली आहे. देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७१,२०,५३८ आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार ८,६१,८५३ कोरोना रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या १२.१० टक्के आहे. सलग चौथ्या दिवशी या रुग्णांची संख्या ९ लाखांपेक्षा कमी आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५३ इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. रविवारी कोरोनाचे ७४,३८३ रुग्ण आढळून आले होते. सोमवारी हा आकडा त्याहून कमी आहे.जगामध्ये कोरोनाचे ३ कोटी ७७ लाखांहून अधिक रुग्ण आहेत. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या अमेरिकेमध्ये ७९ लाख ९२ हजार रुग्ण आहेत. या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतातील कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा ८ लाखांनी कमी आहे.

दोन्ही देशांतील रुग्णसंख्येतील तफावत दिवसेंदिवस कमी होत असून, अमेरिकेवर काही दिवसांत मात करून भारत सर्वाधिक कोरोना रुग्णांचा देश होण्याची शक्यता आहे. तिसºया क्रमांकावर असलेल्या ब्राझिलमध्ये ५० लाख ९४ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आहेत.सलग १० दिवस ८० हजारांपेक्षा कमी रुग्णसप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने उच्चांक गाठल्यानंतर आता आॅक्टोबर महिन्यात मात्र सलग दिलासा देणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोना संसर्ग झालेल्यांच्या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. १ आॅक्टोबरनंतर देशातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या ८० हजारांच्या पुढे गेलेली नाही. येत्या काळातही हेच चित्र राहिल्यास लवकरच कोरोना रुग्णांची संख्या घटत जाईल.कोरोना चाचण्यांची संख्या ८ कोटी ७८ लाखांवर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार ११ ऑक्टोबर रोजी9,94,851 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशातील कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता 8,72,093 झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या