शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: दिलासादायक! कोरोनाचे बरे होणारे रुग्ण वाढताहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 06:41 IST

CoronaVirus News: २५ जिल्ह्यांत सर्वात जास्त मृत्यू; त्यातील १५ जिल्हे महाराष्ट्रातील

नवी दिल्ली : गेल्या २ आठवड्यांत कोरोनाचे सक्रिय रुग्ण १० लाखांपेक्षा कमी असून रुग्ण बरे होण्याची टक्केवारीही ८४ टक्क्यांपेक्षाही जास्त झाली, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी येथे सांगितले.प्रसारमाध्यमांना माहिती देताना ते म्हणाले की, देशात कोरोनाचे ७७ टक्के सक्रिय रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशसह दहा राज्यांत आहेत.राजेश भूषण म्हणाले की, ‘‘कोरोना विषाणूमुळे होणारे मृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य मंत्रालय संबंधित राज्यांशी बोलत आहे. आमचे लक्ष्य ते प्रमाण एक टक्क्याच्या खाली आणण्याचे आहे.’’देशात आतापर्यंत ५६ लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. भारत जगात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण बरे होणारा देश बनला आहे. गेल्या एका आठवड्यात आठ लाखांपेक्षा जास्त कोरोनाच्या चाचण्या केल्या गेल्या. आतापर्यंत ८ कोटींपेक्षा जास्त कोरोना चाचण्या झाल्या आहेत.आकडेवारीवरून सांगणे अवघडराजेश भूषण म्हणाले की, कोरोनाचे रुग्ण वाढीचे टोक गाठले गेले का याबद्दल सांगायचे तर आकड्यांवरून काही भाष्य करणे योग्य नाही. आताचे हवामान चिकनगुनिया, डेंगू आणि मलेरियाच्या आजारांचे आहे. राज्यांना जे दिशा-निर्देश दिले गेले त्यांचे पालन त्यांनी कठोरपणे करावे. केरळमध्ये ओणम सणामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे सणांच्या दिवसांत जास्त काळजी घेतली जावी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या