शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: देशात रुग्णांची संख्या साडेपाच लाखांकडे; मृत्युदर मात्र कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 03:46 IST

एका दिवसात वाढले १९ हजार ४५९ रुग्ण

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांची संख्या १९ हजार ४५९ ने वाढल्यामुळे देशात आतापर्यंतच्या रुग्णांचा आकडा आता ५ लाख ४८ हजार ३१८ झाला आहे. तसेच मृतांच्या संख्येत ३८० ची भर पडून मरण पावलेल्यांची संख्या १६ हजार ४७५ पर्यंत गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत रोज १८ हजार वा त्याहून अधिक भर पडत असून, या वेगामुळे पुढील तीन दिवसांत देशात कोरोनाबाधितांचा आकडा ६ लाखांवर गेलेला असेल, असा अंदाज आहे.

जगातील रुग्णांची संख्या १ कोटी २६ लाखांच्या वर गेली असून, मृतांचा आकडा ५ लाखांच्या वर गेला आहे. सर्वाधिक म्हणजे २६ लाख ३७ हजार रुग्ण एकट्या अमेरिकेत असून, तिथे मृतांचा आकडा १ लाख २९ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझीलमध्ये १३ लाख ४५ हजार रुग्ण असून, मृतांची संख्या तिथे ५७ हजार आहे. रशियामध्येही आता रुग्णसंख्या ६ लाख ४१ हजारांवर गेली आहे. तिथे मृतांची संख्या ९ हजारांहून काहीशी अधिक आहे.

रुग्णांच्या बाबतीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. ब्रिटन, इटली, स्पेन, फ्रान्स, मेक्सिको या देशांत रुग्णांची संख्या भारतापेक्षा खूप कमी असली तरी तिथे मृतांची संख्या २५ ते ४८ हजारांच्या आसपास आहे. भारताचा मृत्युदर जगात बराच कमी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही देशात अधिक आहे. आतापर्यंत ३ लाख २१ हजार ७२२ रुग्ण बरे झाले असून, सध्या २ लाख १० हजार १२१ जणांवर उपचार सुरू आहेत. म्हणजेच बरे होण्याचे प्रमाण देशात ५८६७ टक्के आहे.

देशात सर्वाधिक म्हणजे १ लाख ६४ हजार ६२६ रुग्ण महाराष्ट्रात असून, दिल्लीमध्ये ८३ हजार ७७, तर तमिळनाडूमध्ये ८२ हजार २७५ रुग्ण आहेत. या तीन राज्यांत आतापर्यंत अनुक्रमे ७ हजार ४२९, २६२३ व १0७९ रुग्ण मरण पावले आहेत. गुजरातमध्ये रुग्णांची संख्या ३१ हजार ३२० रुग्ण असून, तिथे मरण पावलेल्यांची संख्या आता १८०८ झाली आहे. रुग्णांच्या तुलनेत मरण पावणाऱ्यांचे प्रमाण सध्या गुजरातमध्ये अधिक आहे.८४ लाख नमुने तपासलेरुग्णांचे प्रमाण वाढत असले, तर देशभर कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांत १ लाख ७0 हजार ५६0 नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत ८३ लाख ९८ हजार ३६२ नमुने तपासण्यात आल्याची माहिती आयसीएमआरतर्फे देण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या