शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: जगाच्या तुलनेत भारतात रुग्ण, मृतांची संख्या कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 06:53 IST

बळींचे प्रमाण घटले; स्थितीतही काहीशी सुधारणा

नवी दिल्ली : जागतिक पातळीच्या तुलनेत भारतामध्ये कोरोना रुग्ण तसेच या आजाराला बळी पडलेल्यांचे प्रमाण (केस फॅटिलिटी रेट - सीएफआर) कमी आहे. गेल्या पाच महिन्यांत भारतातील सीएफआर पहिल्यांदाच २.५ टक्क्यांपेक्षा कमी झाला.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जागतिक स्तरावरील सीएफआर १८ जुलै रोजी ३.४१ टक्के होता. देशात १२ मार्च रोजी कोरोनाचा पहिला बळी गेला. त्यावेळेपासून मे महिन्याच्या मध्याला ३.२३ टक्के इतका सर्वात जास्त सीएफआर नोंदविला गेला. त्यानंतर भारताचा सीएफआर दर हा २.८ टक्क्यांच्या आसपासच होता.देशात कोरोना रुग्ण शोधण्यासाठी वेगाने सुरू केलेल्या हालचाली, चाचण्यांची वाढविलेली संख्या व उपचारविषयक सोयीसुविधा वेळीच उपलब्ध करून दिल्याने सीएफआरचे प्रमाण कमी झाले. देशातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण कमी राखण्यात यश आले असून सध्या २.४९ टक्के इतका सीएफआर आहे. जगातील सर्वात कमी सीएफआर भारताचा आहे.काही राज्ये कोरोनाचा यशस्वीरितीने मुकाबला करत असून तिथे या आजारामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामध्ये मणिपूर, नागालँड, सिक्कीम ही राज्ये व अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे.१४ राज्यांचा दर १ टक्क्यांहून कमी: २९ राज्यांतील सीएफआर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. तर १४ राज्यांचा सीएफआर हा १ टक्क्यांहून कमी आहे. कोरोनाच्या आजारातून भारतात जास्तीत जास्त लोक बरे होत असून मृत्यूचे प्रमाण घटले.राज्ये आणि सीएफआरचे प्रमाण : त्रिपुरा (०.१९ टक्के), आसाम (०.२३ टक्के), केरळ (०.३४ टक्के), ओदिशा (०.५१ टक्के), गोवा (०.६० टक्के), हिमाचल प्रदेश (०.७५ टक्के), बिहार (०.८३ टक्के), तेलंगणा (०.९३ टक्के), आंध्र प्रदेश (१.३१ टक्के), तामिळनाडू (१.४५ टक्के), चंदीगढ (१.७१ टक्के), राजस्थान (१.९४ टक्के), कर्नाटक (२.८ टक्के), उत्तर प्रदेश (२.३६ टक्के) या राज्यांचा समावेश होतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या