शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: दिलासादायक! गेल्या २४ तासात राजधानी दिल्लीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 11:05 IST

दिल्लीच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीत आतापर्यंत ३० जणांना कोरोनाची लागण झाली आहे

ठळक मुद्देकर्नाटकात 33 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, तर एकाचा मृत्यू महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या १०० च्या वर पोहचली राजधानी दिल्लीने कोरोनाची साखळी ब्रेक केली पण काळजी घेणं आवश्यक

नवी दिल्ली – जगभरात कोरोना व्हायरसने अनेक देशांना आपल्या विळख्यात ओढलं असताना भारतातही कोरोना रुग्णांची संख्या ५०० वर पोहचली आहे. आतापर्यंत १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच दिल्लीतून एक दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या 24 तासांत राजधानीत कोरोनाचा कोणताही नवीन रुग्ण आढळलेला नाही.

पहिल्या तीन दिवसांत दिल्लीत 16 जणांना कोरोनाची लागण झाली होती. अशा परिस्थितीत सोमवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तुटलेली पाहायला मिळाली. मात्र असं असलं तरी अद्यापही कोरोनाचा संक्रमणाचा धोका कायम आहे. पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणूनच डॉक्टर लोकांना घरामध्येच राहण्याचा सल्ला देत आहेत जेणेकरून संक्रमणाचा धोका कमी करता येईल.

दिल्लीच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीत आतापर्यंत ३० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. २० मार्च ते २२ मार्च या तीन दिवसात १६ रुग्णांची नोंद झाली. यातील ५ रुग्णांची तब्येत बरी झाली असून त्यांना घरी सोडण्यात आलं तर मागील दिवसात एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या सफदरजंग रुग्णालयात ११ रूग्ण दाखल आहेत. लोकनायक रुग्णालयात ६, राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 5 आणि जीटीबीमध्ये एक रुग्ण दाखल आहे.

इतर राज्यांची काय परिस्थिती?

कर्नाटकात 33 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात 30 लोक कोरोना संक्रमित आहेत. दिल्लीत 29 लोकांना याची बाधा झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 29 संक्रमित असून, एकाचा मृत्यू झाला आहे. हिमाचलमध्येही 3 संक्रमित असून, एकाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात संक्रमितांची संख्या 97 असून, आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमध्ये 21 जण संक्रमित आढळले असून, एकाचा मृत्यू ओढवला आहे. पश्चिम बंगालमध्ये सात जणांना संसर्ग झालेला असून, एकाचा मृत्यू झाला आहे. या विषाणूला नियंत्रित करण्यासाठी सरकारनं काही निर्बंध लादले असून, त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर केंद्र सरकारने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली