शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : राष्ट्रीय महामार्गावर २० एप्रिलपासून पुन्हा सुरू होणार टोलवसुली; केंद्रानं दिली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 10:36 IST

केंद्र सरकारने २० एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास राष्ट्रीय महामार्गांवर टोलवसुली सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

नवी दिल्लीः कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता मोदी सरकारनं २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. तोच लॉकडाऊन आता ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्याचदरम्यान मोदी सरकारनं एक नियमावली बनवली असून, काही गोष्टींना सूट दिली आहे. राष्ट्रीय महामार्गावर २० एप्रिलपासून टोलवसुली करण्यासही केंद्रातील मोदी सरकारनं मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने २० एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास राष्ट्रीय महामार्गांवर टोलवसुली सुरू करण्यास परवानगी दिली आहे.गृह मंत्रालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, टोलवसुली संग्रह सरकारी तिजोरीला हातभार लावतो आणि अर्थसंकल्पीय पाठबळासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास आर्थिक मजबुती देतो. आंतरराज्य व बाह्य राज्यात सर्व ट्रक व इतर वस्तू किंवा वाहनांसाठी गृह मंत्रालयाने दिलेली शिथीलता लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर आवश्यक ती कारवाई करावी. त्यादृष्टीने २० एप्रिल २०२० पासून टोलवसुली पुन्हा सुरू केली जाणार आहे.दरम्यान, अखिल भारतीय मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसने केंद्र सरकारला टोलवसुली पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस (एआयएमटीसी)चे अध्यक्ष कुलतरणसिंग अटवाल यांनी याचा निषेध नोंदवला आहे. ते म्हणाले, या क्षेत्रावर कोणताही आर्थिक भार टाकण्यापूर्वी सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. लॉकडाऊनमुळे आधीच या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNational Highwayराष्ट्रीय महामार्ग