शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: धक्कादायक! ऑक्सिजन पाईप काढून कोरोना बाधितेला जीवे मारण्याचा प्रयत्न; दोन वॉर्डबॉय पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 18:57 IST

CoronaVirus News: मुलानं धाव घेतल्यानं महिलेचा जीव वाचला; दोन्ही वॉर्ड बॉय फरार

ग्वाल्हेर: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानं आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आहे. अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर अभावी अनेक रुग्ण प्राण सोडत आहेत. अशा परिस्थितीत कुठे माणसुकी जिवंत असल्याची उदाहरणं पाहायला मिळत असताना काही ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. मुंबईतील असाही कोविडयोद्धा! रिक्षावाला जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांना देतोय मोफत सेवामध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमधील जिल्हा रुग्णालयातील एका कोरोनाग्रस्त महिलेचा ऑक्सिजन पाईप काढून तिला मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं हा प्रकार तिच्या मुलानं पाहिला. त्यानं दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी त्याला धक्का देऊन पळून गेले. यानंतर डॉक्टरांनी ऑक्सिजन पाईप पुन्हा लावला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.सतर्कता! कोरोनावरील उपचारासाठी ‘या’औषधाचा वापर करणं धोक्याचं; WHO चा इशारागुढा परिसरात वास्तव्यास असलेल्या ४९ वर्षीय पूनम वीरे काही दिवसांपासून आजारी होत्या. आठ दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्या किडनी आणि यकृतावर कोरोना संक्रमणामुळे परिणाम झाला होता. पूनम यांची प्रकृती गंभीर असून त्या काही दिवसच जिवंत राहू शकतील, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर त्यांचा मुलगा दीपकनं त्यांना मुरार जिल्हा रुग्णालयाच्या कोविड वॉर्डमध्ये दाखल केलं.आईची काळजी घेण्यासाठी दीपक स्वत: रुग्णालय परिसरात बाहेर बसून असायचे. ते खिडकीतून आपल्या आईला पाहायचे. रविवारी रात्री सव्वा अकरा वाजता दीपक लघुशंकेला जात होते. त्यावेळी रुग्णालयाचे दोन वॉर्ड बॉय (राहुल आणि सोनू) वॉर्डमध्ये होते. दीपक परतत असताना त्यांना हे दोन वॉर्ड बॉय आईला लावण्यात आलेला ऑक्सिजन पाईप काढताना दिसले. दीपकनं आरडाओरडा करत दोघांना पकडलं. मात्र ते दोघे धक्का देऊन तिथून पळून गेले. त्या दोघांनी दीपक यांच्या आईचे कानातले लंपास केले. पोलीस सध्या त्या दोघांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या