शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: बिनकामाच्या चाचण्या बंद करा; देशातील ३५ डॉक्टरांचे केंद्र-राज्य सरकारला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 07:46 IST

केंद्र आणि राज्याच्या आरोग्य यंत्रणांनी या अनावश्यक उपचारपद्धती आणि चाचणीचा वापर थांबविला पाहिजे, अशी विनंती डॉक्टरांनी या पत्राद्वारे केली आहे. 

मुंबई : भरमसाठ चाचण्या आणि त्याची अवाजवी बिले यांनी गांजलेल्या रुग्णांच्या व्यथेला आता डॉक्टरांकडूनही आवाज मिळाला आहे. रुग्णांच्या लुटीचे मोठे जाळे मानल्या जाणाऱ्या या चाचण्यांवर राज्य सरकारने दरनिश्चितीचे बंंधन आणले होते. त्यालाही व्यावसायिकांनी विरोध केला. त्याचेच पडसाद कोरोनाच्या दोन लाटांमध्ये पडलेले दिसले. आधीच खचलेला रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांच्यावर मानसिक ताण निर्माण करणाऱ्या या बिनकामाच्या चाचण्यांवर भर दिला जातोय, असा दावा देशातील ३५ तज्ज्ञ डॉक्टरांनी केला आहे. केंद्र आणि राज्याच्या आरोग्य यंत्रणांनी या अनावश्यक उपचारपद्धती आणि चाचणीचा वापर थांबविला पाहिजे, अशी विनंती डॉक्टरांनी या पत्राद्वारे केली आहे. विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या ३५ डॉक्टरांनी केंद्र आणि राज्य सरकारला पत्र पाठविले आहे. यातील ३५ डॉक्टरांपैकी डॉ.संजय नागराल यांनी सांगितले, कोविड उपचार, चाचणी आणि रुग्णालयात भरती करणे, यावर देशात अनावश्यक भर दिला जात आहे. सद्यस्थितीबाबत ही भूमिका सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या पत्राद्वारे करण्यात आला आहे.अमेरिकेतील हार्वर्ड आणि जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील भारतीय वंशाच्या काही डॉक्टरांनी या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या पत्रातील माहितीनुसार, २०२१च्या कोरोना लाटेतील काही चुकांची पुनरावृत्ती २०२२ मध्ये होत आहे. डॉक्टरांच्या चमूने तीन प्रमुख समस्या मांडल्या आहेत. अवास्तव औषधोपचार, अवाजवी चाचण्या आणि आवश्यकता नसतानाही रुग्णालयात भरती करणे, ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य आहेत. काही रुग्णांना तर औषधांचीही आवश्यकता नाही किंवा त्यांना किरकोळ औषधोपचारानंतर रुग्ण बरे होत आहेत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.कुटुंबावरील आर्थिक ताण वाढतोय औषधांच्या अति वापरामुळे दुसऱ्या लाटेदरम्यान म्युकरचा उद्रेक झाला. बहुसंख्य रुग्णांची आधी रॅपिड अँटिजन टेस्ट, आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे आहे. यानंतर, संबंधित रुग्णांना फक्त विलगीकरण ठेवले, तरी पुरेसे आहे. मात्र, अशा रुग्णांनाही सीटी स्कॅन, तसेच महागड्या रक्तचाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो. या महागड्या चाचण्या आणि गरज नसतानाही रुग्णालयात भरती केल्याने, कुटुंबांवरील आर्थिक बोजा वाढत असल्याची खंतही या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या