शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : देशात सलग सातव्या दिवशी नव्या रुग्णांची संख्या ३० हजारांहून कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 00:57 IST

CoronaVirus News: रविवारी कोरोनाचे २६,६२४ नवे रुग्ण आढळून आले तर २९,६९० जण बरे झाले. रविवारी या आजारामुळे आणखी ३४१ जण मरण पावले असून बळींची संख्या १,४५,४७७ झाली आहे. देशात ३ लाख ५ हजार सक्रिय रुग्ण आहेत. 

नवी दिल्ली : देशामध्ये सलग सातव्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ३० हजारांपेक्षा कमी आहे. दररोजच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या १ कोटी ३१ हजार झाली असून त्यातील ९५ लाख ८० हजार लोक बरे झाले.रविवारी कोरोनाचे २६,६२४ नवे रुग्ण आढळून आले तर २९,६९० जण बरे झाले. रविवारी या आजारामुळे आणखी ३४१ जण मरण पावले असून बळींची संख्या १,४५,४७७ झाली आहे. देशात ३ लाख ५ हजार सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १,००,३१,२२३ तर बरे झालेल्यांचा आकडा ९५,८०,४०२ आहे. देशामध्ये रुग्णांचा मृत्युदर १.४५ टक्के तर बरे झालेल्यांचे प्रमाण ९५.४६ टक्के आहे. जगात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७ कोटी ६६ लाखांपेक्षा अधिक असून, त्यातील ५ कोटी ३७ लाख बरे झाले.

लसीच्या दुष्परिणामाच्या खोट्या दाव्यांपासून द्या लस उत्पादकांना संरक्षण; अदर पूनावाला यांची मागणीदेशात कोरोना लसीचे दुष्परिणाम झाल्याचा खोटा दावा करणारे लोक व त्यांनी दाखल केलेल्या खटल्यांपासून लस उत्पादकांचे केंद्र सरकारने संरक्षण केले पाहिजे, अशी मागणी सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केली आहे.अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ विकसित करीत असलेल्या लसीच्या मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा भारतात सीरम इन्स्टिट्यूटतर्फे पार पडत आहे. या चाचण्यांमध्ये लसीमुळे आपल्या प्रकृतीवर दुष्परिणाम झाल्याचा दावा करीत चेन्नईतील एका व्यक्तीने सीरम इन्स्टिट्यूटला कायदेशीर नोटीस बजावली होती. त्या व्यक्तीने बदनामी केल्याचा आरोप करीत त्याला सीरमनेही १०० कोटी रुपये भरपाई मागणारी कायदेशीर नोटीस पाठवली.या पार्श्वभूमीवर ग्लोबल टेक्नॉलॉजी समीट २०२० या कार्यक्रमातअदर पूनावाला म्हणाले की, कोरोना लसीकरणादरम्यान प्रकृतीवर दुष्परिणाम झाल्याचे खोटे दावे करणाऱ्या लोकांवर कडक कारवाईकरावी, अशी मागणी अनेक देशांमध्ये होऊ लागली आहे. एखाद्याने केलेलादावा खोटा असला तरी त्याची अवाजवी प्रसिद्धी होते व त्याचा लसीकरण मोहिमेवर परिणाम होऊ शकतो. अदर पूनावाला म्हणाले की, कोरोनासाथीच्या काळात लस उत्पादकांना संरक्षण देणारा एक कायदा अमेरिकेने तयार केला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या