शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार?, परिस्थिती नियंत्रणात कधी येणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 08:10 IST

CoronaVirus News: देशात गेल्या १३ दिवसांत १४ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद; काल देशात पहिल्यांदा आढळले तब्बल २ लाख कोरोना रुग्ण

नवी दिल्ली: गेल्या महिनाभरापासून देशातील कोरोना रुग्णांच्या आकडा झपाट्यानं वाढत आहे. ५ एप्रिलला देशात पहिल्यांदा दिवसभरात १ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर पुढील १० दिवसांत हा आकडा २ लाखांच्या पुढे गेला. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक भीषण ठरत आहे. ही लाट नेमकी कधी ओसरणार आणि परिस्थिती कधी पूर्ववत होणार, असे प्रश्न संपूर्ण देशाला पडले आहेत. आयआयटी कानपूरमधील एका टीमनं गणिती मॉडेलच्या माध्यमातून कोरोना रुग्णसंख्या आणि रुग्णवाढीचा अभ्यास करून यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. (CoronaVirus News second corona wave might reach its peak between 20 to 25th april predicts iit kanpur team)पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये देता येऊ शकते वेगवेगळी कोरोनाची लस? तज्ज्ञ सांगतात की....देशातील कोरोनाची दुसरी लाट २० ते २५ एप्रिल दरम्यान शिखरावर असेल, अशी माहिती आयआयटी कानपूरच्या टीमनं दिली आहे. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी दुसऱ्या लाटेबद्दल काही महत्त्वाचे अंदाज वर्तवले आहेत. 'दिवसाला दोन लाख कोरोना रुग्ण हे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं शिखर असेल, असा आमचा अंदाज होता. २० ते २५ एप्रिल दरम्यान देशात दिवसाला २ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद होईल, असा आमचा होरा होता,' असं अग्रवाल म्हणाले.मास्क लावूनही होऊ शकतो कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग; जर तुम्हीही करत असाल याच चुकाकोरोनाच्या लाटेचं शिखर नेमकं कधी येईल याचा अंदाज कसा बांधला जातो, या प्रश्नालादेखील अग्रवाल यांनी उत्तर दिलं. कोरोनाच्या काही विशेष गोष्टींचा अभ्यास करून हा अंदाज वर्तवला जातो. यामध्ये दररोज होणारा कोरोनाचा फैलाव, लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये घालण्यात आलेले निर्बंध या प्रमुख बाबींचा समावेश असतो, असं अग्रवाल यांनी सांगितलं.''मे महिन्यात स्थिती चांगली असेल''२५ एप्रिलनंतर देशातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागेल, असा दिलासादायक अंदाज अग्रवाल यांनी वर्तवला. मे महिन्याच्या अखेरपर्यंत परिस्थितीत सुधारणा झालेली असेल. प्रत्येक राज्यात कोरोना लाटेचं शिखर वेगवेगळ्या कालावधीत येईल का, यावर २० ते २५ एप्रिल या कालावधीत मोठ्या राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट शिखर गाठेल, असं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी आलेली कोरोनाची लाट आणि आता आलेली कोरोनाची दुसरी लाट यात एक प्रमुख फरक आहे. आता कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. प्रादुर्भाव जास्त आहे. पण त्या तुलनेत मृतांचा आकडा कमी आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला देशातील कोरोना रुग्णांचा आकडा खाली आला होता. लस उपलब्ध झाल्यानं लोक निर्धास्त झाले. त्यामुळेच कोरोनाचा फैलाव वाढला, असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या