शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: माझी आई मरेल हो...! मुलगा ओरडत राहिला; पोलिसांनी VIPसाठी ऑक्सिजन सिलिंडर हिसकावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 09:00 IST

VIDEO: पोलिसांनी तरुणाकडे असलेला ऑक्सिजन सिलिंडर हिसकावला; तरुणाच्या आईचा दोन तासांनंतर मृत्यू

आग्रा: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक झपाट्यानं वाढत आहे. गेल्या आठवड्याभरापासून देशात दररोज कोरोनाच्या ३ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. देशातील आरोग्य व्यवस्था व्हेटिंलेटरवर आहे. अशा परिस्थितीत काही ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. उत्तर प्रदेशच्या आग्र्यात घडलेल्या घटनेनं पोलीस प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पोलिसांच्या मनमानीपणामुळे एका महिलेचा जीव गेला आहे.एका किडनीच्या भरवशावर कोरोनाला दिली मात; ८२ वर्षीय पुष्पाताईसुद्धा झाल्या बऱ्याआग्र्यातील एका रुग्णालयात १७ वर्षांच्या तरुणाची आई उपचार घेत होती. तिच्यासाठी तरुणानं कसाबसा ऑक्सिजन सिलिंडर मिळवला. मात्र पोलिसांनी त्याच्याकडून सिलिंडर हिसकावून घेतला. तरुण पोलिसांसमोर गुडघ्यावर बसून, हात जोडून ऑक्सिजन सिलिंडर परत द्या अशी विनंती करत होता. मात्र पोलिसांनी जराही दया आली नाही. 'सिलिंडर नेऊ नका. माझी आई मरेल. मी तिच्यासाठी ऑक्सिजनची व्यवस्था कुठून करा?', अशी आर्त साद घालत तरुण आक्रोश करत होता. 

आग्र्यातील रुग्णालयाबाहेरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर आणि वर्तणुकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अतिरिक्त पोलीस संचालक राजीव कृष्णा यांनी व्हायरल व्हिडीओच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आग्र्याच्या एका रुग्णालयात काही पोलीस कर्मचारी ऑक्सिजन सिलिंडर नेण्यास आले होते. त्यांनी एका मुलाला ऑक्सिजन सिलिंडर नेताना पाहिलं. त्यांनी त्याच्याकडून सिलिंडर हिसकावून घेतला. व्हिडीओमध्ये पीपीई किट घातलेला मुलगा गुडघ्यावर बसून पोलिसांकडे सिलिंडर परत देण्याची विनंती करताना दिसत आहे.प्रचार, कुंभमेळ्याहून परतलेले ठरणार सुपरस्प्रेडर; राज्यात संक्रमण वाढण्याची शक्यतापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ आग्र्यातल्या उपाध्याय रुग्णालयातला आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणाचं नाव अंश गोयल आहे. अंशला मोठ्या मुश्किलीनं आईसाठी ऑक्सिजन सिलिंडर मिळाला होता. मात्र कोण्या व्हीआयपीसाठी पोलिसांनी त्याच्याकडे असणारा सिलिंडर हिसकावून घेतला. दोन तासांनी त्याच्या आईचा मृत्यू झाला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या