शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

CoronaVirus News : ‘इटोलिझुमाब’च्या वापरास परवानगी; निष्कर्ष समाधानकारक, एम्समधील तज्ज्ञांचा निर्वाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 07:03 IST

देशातील कोरोनाच्या रुग्णांवर इटोलिझुमाब या औषधाच्या घेण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष तज्ज्ञांच्या समितीला समाधानकारक वाटले. या समितीत एम्स रुग्णालयातील फुप्फुसविकार तज्ज्ञ, औषधतज्ज्ञांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : सोरायसिस या त्वचा रोगावर देण्यात येणारे इटोलिझुमाब या औषधाचा कोरोनाची कमी ते तीव्र लक्षणे दिसत असणाऱ्या रुग्णांवरील तातडीच्या उपचारांत मर्यादित वापर करण्यास केंद्रीय औषध नियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमाणी यांनी परवानगी दिली आहे.एखादा आजार जडल्यासत्याला प्रतिबंध करण्यासाठी प्रतिकारशक्तीचा वापर करण्याकरिता एका पेशीकडून दुसºया पेशीला संदेश देण्याचे काम सायटोकिन या पेशी करतात. त्या पेशी जर नेहमीपेक्षा अधिक वेगाने सक्रिय झाल्या तरी त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. सायटोकिन पेशींच्या कार्यातील बिघाडाची ही लक्षणे जर कोरोना रुग्णांमध्ये आढळून आली तर तातडीचा उपचार म्हणून इटोलिझुमावचे इंजेक्शन देण्यास केंद्रीय औषध नियंत्रकांनी परवानगी दिली आहे.देशातील कोरोनाच्या रुग्णांवर इटोलिझुमाब या औषधाच्या घेण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष तज्ज्ञांच्या समितीला समाधानकारक वाटले. या समितीत एम्स रुग्णालयातील फुप्फुसविकार तज्ज्ञ, औषधतज्ज्ञांचा समावेश आहे. बायोकॉन या कंपनीकडून बनविण्यात येणारे इटोलिझुमाब हे औषध गेल्या अनेक वर्षांपासून सोरायसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठीवापरले जाते.कोरोना संसर्गावरील उपचारांत रेमडेसिव्हिरपासून आणखी काही औषधांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे औषध कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रभावी ठरेल असे म्हटले जात होते. पण प्रत्यक्ष चाचण्यांतून तसे आढळून आले नाही. भारतात कोरोनारुग्णांच्या उपचारांत रेमडेसिव्हिरपेक्षा डेक्सामिथेसॉन हे औषध अधिक प्रभावी ठरेल, असे काही तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.रुग्णाची लेखी परवानगी आवश्यकइटोलिझुमाब या औषधाच्या चाचण्यांचे निष्कर्ष समाधानकारक आहेत. या लसीचा उपचारांमध्ये वापर करण्यासाठी संबंधित कोरोना रुग्णाची लेखी परवानगी घेणे केंद्रीय औषध नियंत्रकांनी बंधनकारक केले आहे. त्यामुळे उपचार करणारे डॉक्टरही निश्चिंत राहतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या