शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : ‘पतंजली’ला परवाना तापाच्या औषधासाठी, कोरोना उपचारांसाठी नव्हे; आयुष मंत्रालयानं कंपनीकडून मागितले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 04:05 IST

पतंजलीला दिलेला परवाना कोरोनावरील उपचारांसाठी नव्हे, तर रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे बूस्टर आणि तापावरील औषध यासाठी दिला होता.

नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोना विषाणूवर मात करणारे औषध पतंजलीने तयार केल्याचा दावा केल्यानंतर काही तासांतच उत्तराखंडच्या आयुष मंत्रालयाने म्हटले की, पतंजलीला दिलेला परवाना कोरोनावरील उपचारांसाठी नव्हे, तर रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे बूस्टर आणि तापावरील औषध यासाठी दिला होता.उत्तराखंडच्या वैद्यकीय परवाने देणाऱ्या प्राधिकरणाचे सहसंचालक डॉ. व्हाय. एस. रावत म्हणाले की, दिव्या फार्मसीने कोरोनावर औषधासाठी परवाना मागितला नव्हता आणि त्यांना तसा परवाना दिलेला नाही. परवाना रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे बूस्टर आणि तापावरील औषध यासाठी होता. त्यामुळे आयुष विभागाने दिव्या फार्मसीला नोटीस दिली. समाधानकारक उत्तर न आल्यास त्यांना दिलेला परवाना रद्द करण्यात येईल. आयुष मंत्रालयाने पतंजलीला या औषधाचे नाव, त्यातील घटकांची माहिती, ज्या ठिकाणी याचे संशोधन केले त्याची माहिती, नमुन्याचे घेतलेले प्रमाण, संस्थात्मक आचारसंहिता समितीने दिलेली मंजुरी, सीटीआरआय नोंदणी, औषधांचे दिसून आलेले परिणाम आणि अभ्यासातून समोर आलेली माहिती आदी सर्व तपशील सादर करण्यास सांगितले आहे.मंगळवारी बाबा रामदेव यांनी कोरोनावर मात करणारे ‘कोरोनील’ हे औषध बाजारात आणले. या गोळ्यांमुळे रुग्ण कोरोनातून बरे झाल्याचा दावा त्यांनी केला; परंतु आयुष मंत्रालयाने पूर्ण शहानिशा केल्याशिवाय या औषधाची जाहिरात करू नका, असे सांगितले.>अभ्यास केल्यानंतर परवाना -आयुषमंत्रीकेंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, बाबा रामदेव यांनी कोरोनासाठी औषध पुढे आणले, ही एक चांगली बाब आहे; परंतु हे औषध नियमानुसार पहिल्यांदा आयुष मंत्रालयाकडे यायला हवे होते. पतंजलीने या औषधांच्या संदर्भातील कागदपत्रे मंगळवारी आमच्याकडे पाठविली आहेत. आम्ही त्यांचा आधी अभ्यास करू, नंतरच त्याला परवाना देण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याpatanjaliपतंजली