शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: चिंताजनक! लक्षणीय लोकसंख्या कोरोनाच्या विळख्यात; आरोग्य मंत्रालयानं सांगितला धोका

By कुणाल गवाणकर | Updated: September 29, 2020 20:40 IST

देशाला असलेला कोरोनाचा वाढता धोका कायम; आरोग्य मंत्रालय आणि आयसीएंमआरची माहिती

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव देशात कायम असून अद्यापही धोका टळलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता कोरोनाची लाट ओसरत असल्याचं दिसून येत होतं. मात्र आरोग्य मंत्रालयानं देशातल्या जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. याआधी आरोग्य क्षेत्राशी संबंधित संघटना, जागतिक तज्ज्ञांनीदेखील धोका कायम असल्याचा इशारा दिला होता.देशातील मोठी लोकसंख्या अजूनही कोरोनाच्या विळख्यात असल्याचं आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं. यासाठी आरोग्य मंत्रालयानं सीरो सर्व्हेचा आधार घेतला. कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्यानं सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचं, वारंवार हात धुण्याचं आणि मास्क वापरण्याचं आवाहन मंत्रालयाकडून करण्यात आलं.यावेळी आरोग्य मंत्रालयानं काही आकडेवारी सांगितली. 'देशात आतापर्यंत ५१ लाखांपेक्षा अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे. हा आकडा जगात सर्वाधिक आहे. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ८३ टक्के इतकं आहे. कोरोना रुग्ण लवकर आढळून यावेत आणि त्यांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. दर १० लाख नागरिकांमागे ५२ हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत,' अशी माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली.देशात आतापर्यंत ६१ लाख ६५ हजार २९१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातल्या ५१ लाख १ हजार जणांनी कोरोनावर मात केली. तर ९६ हजार ३१८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ओडिशामध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढलं असून आसाममधील रुग्ण वाढीचा वेग किंचित कमी झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या